गुढीपाडव्याला करा कवड्यांचा उपाय, लक्ष्मीची होईल कृपा!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव अगदी आनंदाने साजरा करीत असतात. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. प्रत्येक जण या दिवशी खूपच आनंदी राहत असतो. जेणेकरून येणारे वर्ष हे आपल्यासाठी आनंदी जाईल. गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरासमोर गुढी देखील उभारली जाते.

तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देखील गुढीपाडव्याच्या दिवशी केला जातो. तर गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर अनेक वस्तूंची खरेदी देखील केली जाते आणि शुभकामनांची सुरुवात या दिवशी केली जाते. तर अशा या गुढीपाडव्याला जर तुम्ही असे काही ज्योतिषी उपाय जर केले तर यामुळे लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर होऊ शकते.

तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्याला कवड्यांचा उपाय कसा करायचा जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. याची सविस्तर माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कवड्यांचा हा उपाय. तर गुढीपाडव्याला अकरा कवड्यांची माळ तयार करावी. जुन्या काळापासूनच कवडीला लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे.

लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा वापर केला जातो.कवड्यांचा उपयोग हा आपल्याला शुभकामासाठी खूप होतो. कावड्याचा कलर हा वेगवेगळा असतो . तपकिरी, पांढरा, पिवळा हे कवड्याचे कलर आहेत. कवड्या ह्या समुद्रातून प्राप्त होतात. काही कवड्या जुळलेल्या असतात तर काही एक एक सुध्दा असतात.

गुढपाडव्या दिवशी कवड्याची माळ हे शुभ आहेच तसेच धनलाभ हि खुप होतो. गुढपाडव्या दिवशी आपल्याला धनवान व्हायचे असेल तर एक उपाय नक्की करुन पहा. तो उपाय काय आहे ते मी सांगते. हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही नक्की धनवान होणार. गुढीची पुजा तर आपण दरवर्षी करतोच.

त्याचसोबत यावर्षी आपल्याला धनलाभ होण्यासाठी कोणता उपाय करायला लागणार हे सागते. आपण आकरा कवड्या घ्यायच्या आहेत. ते स्वच्छ धुवून घायच्या आहेत. त्याच्या नंतर अकरा कवड्याची माळ तयार करायची आहे.
सकाळी उठल्यानंतर आपण घरातील देवघराची पूजा करतो तसेच गुढीची पूजा करतो.

त्यासोबतच आपणाला या 11 कवड्याची देखील पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर त्या कवड्या आपल्याला एका पिवळ्या वस्त्रांमध्ये ठेवून त्या तिजोरीमध्ये तशाच पिवळ्या कपडा मध्ये गुंडाळून ठेवायच्या आहेत. जेणेकरून हा उपाय जर तुम्ही केला तर घरामध्ये भरभराट नक्कीच होणार आहे.

तर असा हा कवड्याचा उपाय जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर याचा नक्कीच तुम्हाला लाभ होणार आहे. तर घरातील देवघरा मधील देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही गुढीची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला या कवड्याची पूजा करून एका पिवळ्या वस्त्रांमध्ये गुंडाळून त्या कवड्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवायच्या आहेत. यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. तर अशा या हिंदू नववर्षाला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी हा कवड्यांचा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *