गुढपाडव्याचे कडुलिंबाशी नाते तुम्हाला माहीत आहे का?

अध्यात्मिक आरोग्य

फाल्गुनात झाडांची पानगळ होते आणि चैत्राच्या सुरुवातीला झाडांना नवीन पालवी फुटू लागते, सृष्टीला नवा बहर येतो, धरती हिरव्या शालुने नटलेली दिसते. असा हा आनंददायी ऋतू बदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर अशा नव्या पालवीला चैत्रपालवी असे म्हणतात. वसंत ऋतुचे आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ चैत्र पाडवा म्हणून साजरा करण्यात येतो.

दारोदारी गुढ्या उभारणे हे पाडव्याचे वैशिष्ट्य आहे. गुढीवर कडूलिंबाच्या पानांचा फाटा लावला जातो. पण प्रत्येकाला प्रश्न असेल की गुढीपाडव्याला कडूलिंबाची पाने का लावली जातात? चला तर मग त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मित्रांनो गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच की वातावरणातल्या चांगल्या लहरी आपल्या दारात याव्या. या दिवशी गोड पकवान करण्याची प्रथा सुद्धा आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. कडुलिंब हे आरोग्याला चांगले असते. या महिन्यात भरपूर उकाडा असतो. कडूलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

गुढीपाडवा हा सण निसर्गाशी नाते सांगणारा सण आहे. त्यामुळे गुढीला कडूलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळे सागर गाठी सह बांधून ती दारामध्ये उभी करतात. यामागे मोठा आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे. त्यानुसार फक्त गुढीला लिंबाची डहाळी बांधून काम संपत नाही तर काय काय होते ते सुद्धा जाणून घेऊयात.

कडूलिंबाची पाने, मिरे, हिंग, सैंधव मीठ, चिंच, ओवा, गुळ यांचे मिश्रण करून प्रत्येकाने थोडी थोडी हे खायला पाहिजे. यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धता होते. चंदनाचा टिळा लावावा त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होण्यास मदत होते. साखरेच्या गाठी खाव्यात यामुळे शरीरातील रक्तामधील उष्णता कमी होते. श्रीखंड भोजनात ठेवल्यामुळे दमा, सुखा कप, कुपोषण नाहीसे होऊन आरोग्य छान राहण्यास मदत होते.

कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावली जातात. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते. कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडूलिंबामध्ये समाविष्ट आहेत. वसंत ऋतूमध्ये कफचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडुलिंबाचा उपयोग केला जातो. यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नव संजीवनी मिळते. यामुळेच याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे. तसेच कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तसेच कडुलिंबाच्या कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ हे सर्व पदार्थ मिक्स करून चटणी तयार करण्यात येते. आणि ही चटणी प्रत्येकाने खायला पाहिजे कारण गुढीपाडव्याला या चटणीचा खूप मान असतो. या चटणीच्या सेवनाने शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *