नमस्कार मित्रांनो,
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. गुढी म्हणजे विजय आणि पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी जो विजय उत्सव साजरा केला जातो त्याला गुढीपाडवा असे म्हणतात.
गुढीपाडवा का साजरा केला जातो याविषयी पुराणांमध्ये विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानुसार रामायण काळात जेव्हा रावणाने देवी सीतेचे अपहरण केले होते त्यावेळी श्रीराम भगवंत सीता मातेच्या शोधात दक्षिण भारतात गेले. तेव्हा त्यांना समजले की, रावणाने सीता मातेचे अपहरण केले आहे.
त्या वेळी दक्षिण भारतात वालीचे राज्य होते. तेथेच श्रीराम भगवंत व लक्ष्मण यांना सुग्रीव भेटले आणि त्यांनी वालीच्या राज्यात आपण काही करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. त्यावेळी वालीचा वध स्वतः श्रीराम भगवंतानी केला आणि दक्षिण भारतातील जनतेला त्याच्या दहशतीतून बाहेर काढले. तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस.
म्हणूनच असे मानले जाते की, या दिवसापासून गुढीपाडव्याचा हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. गुढ्या तोरणे लावून घरे सजविले जातात. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. म्हणून या दिवसाला नवसंवत्सराचा म्हटले जाते.
तसेच ज्योतिषी भास्कराचार्य यांनी याच दिवशी सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंतच्या पंचांगाची निर्मिती केली होती. तसेच एक कथा अशीही म्हटले जाते की शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाला खूप शत्रू त्रास देत होते. त्या शत्रूंचा बंदोबस्त करणे त्याला एकट्याला शक्य नव्हते म्हणून त्याने मातीचे सैन्य बनवले आणि त्यांच्यामध्ये प्राण फुंकले.
ते सर्व लढण्यास सज्ज झाले आणि चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी त्या कुंभाराच्या मुलाने आपल्या सैन्याच्या मदतीने त्या सर्व शत्रूंचा नाश केला आणि विजय मिळवून अयोध्येत प्रवेश करून विजयोत्सव साजरा केला. त्याच दिवसापासून शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला.
या दिवसापासूनच महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र महिना वसंत ऋतूत येतो आणि वसंत ऋतु हा खूप आल्हाददायक असतो. कोकीळा कुहू कुहू करते, आंब्याला मोहर फुटतो, झाडांना छोटी छोटी पालवी फुटते. असे प्रसन्न उत्साही वातावरण असते आणि अशा उत्साही व मंगलमय वातावरणात महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून तोरणे बांधून हा सण साजरा केला जातो.
या दिवसापासून चैत्र नवरात्रीचा प्रारंभ होतो. जो रामनवमीपर्यंत चालतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून कुटूंबातील सर्व व्यक्ती स्नान करून पारंपारिक नवीन वस्त्रे धारण करतात. घराची अंगणाची स्वच्छता केली जाते. अंगणात रंगीत रांगोळी काढली जाते.
दारात आणि देवघरात स्वस्तिकचे चिन्ह काढले जाते. त्यानंतर बांबूचे एक स्वच्छ काठी घेऊन ती व्यवस्थित उंच ठिकाणी बांधावी. त्यावर कडुनिंबाची पाने व आंब्याची डहाळी लावावे. त्यानंतर त्याच्या टोकावर रेश्मी कापड लावावे. साखरेची माळ लावावी आणि त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावावा.
कलशावर स्वस्तिक काढावे आणि कुंकवाची पाच बोटे लावावेत. भगवंताचे नामस्मरण करून गुढीला खिरपुरी, शिरापुरी पुरणपोळी असा गोडधोडाचा नैवेद्य अर्पण करावा. गुढी किंचित झुकलेल्या अवस्थेत असावी. दिवसभर ती गुढी तशीच राहू द्यावी आणि सूर्यास्तापूर्वी ती गुढी खाली उतरवावी.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने व गुळ खाल्ला जातो. कडुनिंबाला नवनवीन पालवी फुटलेली असते. म्हणून कडुलिंबाचे पान कडूही लागत नाही. त्याशिवाय कडुलिंब हा आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो. तसेच वर्षांच्या पहिल्या दिवशी कडूलिंब खाऊन कडू आठवणी सोडून देऊन गुळ खाऊन गोड आठवणी सोबत न्यायच्या असतात.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.