मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक बदल पाहायला मिळतातच. अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडतच असतात. ग्रहांच्या स्थितीमुळे आपल्या जीवनावर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम होत असतो. कधी आपणाला सुखाचे दिवस येतात. तर काही वेळेस आपणाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो.
तर ग्रहांच्या अशाच विचित्र स्थितीमुळे काही राशींची खूपच डोकेदुखी वाढणार आहे. म्हणजेच त्यांना खूप सारे टेन्शन देखील या महिन्यांमध्ये येऊ शकते. तर मार्च महिन्यामध्ये ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींना चिंतेचे दिवस येणार आहेत. तर या राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना खास असणार आहे. या महिन्यात बुध,शनि, सूर्य आणि शुक्र आपली स्थिती बदलणार आहेत. यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर ग्रहमंडळातील स्थितीमुळे मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम दिसून येईल.
शनिदेवांचा कुंभ राशीत उदय, कुंभ राशीत सूर्य आणि बुधाचं अस्तित्त्व आणि शुक्राचा गोचर यामुळे राशीचक्रात बऱ्याच घडामोडी घडणार आहे.शनिदेव 6 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी कुंभ राशीत उदीत होणार आहेत. याच राशीत सूर्य आणि बुध ग्रह ठाण मांडून आहेत.
त्यामुळे शनिच्या उदीत अवस्थेमुळे वृषभ, सिंह, तूळ आणि कुंभ राशीला फायदा होईल. त्यानंतर 15 मार्चला सूर्यदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील. तर शुक्र ग्रह 12 मार्चला मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा धन, सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह सकाळी 8 वाजून 13 मिनिटांनी मार्गक्रमण करणार आहे. तर मग जाणून घेऊयात या मार्च महिन्यामध्ये कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पहिली राशी आहे मेष:- या राशीत राहु आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. ग्रहांच्या विचित्र स्थितीमुळे कौटुंबिक कलह वाढू शकतो. या काळात मेहनत केल्यानंतरही अपेक्षित फळ मिळणार नाही. तब्येतीचा प्रश्न वारंवार येऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल नसेल.
दुसरी राशी आहे सिंह:- या राशीवर सूर्यदेवांची नजर असणार आहे. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक स्थितीचा करावा लागू शकतो. या काळात आर्थिक अडचण प्रकर्षाने जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यविषयक प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रीत करा.
तिसरी राशी आहे कन्या:- मार्च महिन्यात ग्रहांच्या गोचरामुळे निर्माण होणारी स्थिती कन्या राशीसाठी अडचणीची ठरेल. आर्थिक संकट या काळात तुमच्या डोक्यावर घोंघावणार आहे. व्यावसायिकांना या काळात तोटा सहन करावा लागेल. तसेच भागीदारीच्या धंद्यात फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
यानंतरची राशी आहे कुंभ:- या राशीच्या जातकांना सुरुवातीचा महिना तसा चांगला जाईल. पण ग्रहांच्या गोचरानंतर बदल झालेला दिसून येईल. जातकांना कामाच्या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्याल. कौटुंबिक वाद या काळात वाढू शकतात.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.