गोड बोलून घेतलेले उसने/उधार पैसे परत मिळवण्याचा रामबाण उपाय

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आज आपण 1 खास टोटका पाहणार आहोत. अशा व्यक्तींसाठी जे तुमचा घेतलेला पैसा खूप दिवस झाले तरीही परतच करत नाहीयेत. काही व्यक्ती अशा असतात जे पैसे घ्यायचे असतील तर वारंवार तुम्हाला फोन करतात, तुमची भेट घेतात, त्यांची समस्या वारंवार तुम्हाला सांगून पैशाची मागणी करत राहतात.आपणही त्याला फारच गरज असल्याकारणाने पैसे देतो.

परंतु एकदा का पैसा दिला तर घेणारी व्यक्ती परत फिरूनही आपल्याकडे पाहत नाही. आपले पैसे परत द्यायचे तर लांबच पण साधा आपला फोन देखील अशा व्यक्ती उचलत नाहीत. त्यातल्या त्यात आपण जर एखाद्या नातेवाईकाला अगदी जवळच्या व्यक्तीला पैसे दिले असतील आणि आपण ते एक दोनदा त्यांना परत मागितले तरीही ते पैसे काही आपल्याला परत करत नाही.

अशावेळी आपल्याला अडचण होते. आपण त्यांना पैसे कसे मागावे याबद्दल आपण सतत विचार करत राहतो. आपल्या कष्टाचा पैसा असा एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपण फारच त्रस्त होतो. पैसे कसे मिळवायचे याचाच सतत विचार करत राहतो. पण बरेच प्रयत्न करूनही जर पैसे घेणाऱ्या व्यक्तीने तुमचे पैसे परत केले नाही तर अशा व्यक्तींसाठी आज आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत.

या उपायाने अगदी खात्रीशीर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. हा उपाय किंवा टोटका पाहण्याआधी एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर ते मंगळवारी दे नका. असं म्हणतात की, मंगळवारी पैसे उधार दिल्याने घेणारा व्यक्ती ते कधीच परत करत नाही आणि केलेच तर फार उशिरा ते आपल्यापर्यंत येतात.

आणि आपणही कधी कोणाकडून उधार पैसे घेणार असाल तरी देखील ते मंगळवारी घेऊ नका. कारण आपण देखील असे मंगळवारी घेतलेले पैसे लवकर परत करू शकणार नाही. चला तर मग आता तो रामबाण उपाय काय आहे ते आपण पाहूया. भगवान सूर्यदेव पूर्ण सृष्टीला चालवणारे एकमेव जागृती देवता आहेत.

हा उपाय आपल्याला सूर्य देवतांच्या वारी म्हणजेच रविवारी सुरू करायचा आहे. पूर्ण 27 दिवस हा उपाय चालू ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला वाळलेल्या लाल मिरचीच्या बिया लागतील. 27 दिवस अगदी सलग हा नियम करायचा असल्याने तुम्हाला या वाळलेल्या लाल मिरचीच्या बिया बऱ्याश्या लागतील. त्यासाठी तुम्ही बऱ्याश्या बिया एखाद्या डबीमध्ये काढून ठेवल्या तरी चालतील.

तर अशा या लाल मिरचीच्या बिया एका कलशामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. एका कलशामध्ये अगोदर तुम्ही स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये या लाल मिरचीच्या 11 बिया या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हे पाणी रविवारी सूर्य देवतांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि त्यांना मनोभावे तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत किंवा जी तुमची समस्या आहे ती समस्या त्यांना सांगायचे आहे.

तुमचे जे अडकलेले पैसे आहेत ते परत मिळावेत अशी त्यांना मागणी करायची आहे. ज्या रविवारपासून तुम्ही हा उपाय सुरू कराल त्या दिवसापासून पुढे 27 दिवस हा उपाय तुम्हाला चालू ठेवायचा आहे. या 27 दिवसांमध्ये जेवढेपण मंगळवार आणि शनिवारी येथील त्यादिवशी तुम्हाला ज्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे उधार घेतलेले आहे त्यांना सतत पैशाची मागणी करायची आहे.

म्हणजे त्यांना सतत फोन करून किंवा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तुम्हाला पैशाची मागणी करायची आहे. तुम्ही विश्वास ठेवा या 27 दिवसांमध्ये तुमचे पैसे तुम्हाला परत मिळालेले असतील. खूपच परिणामकारक टोटका आहे हा नक्की करून पहा.

फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना तुम्ही रविवारी नॉनव्हेज टाळा. बऱ्याच वेळेला काय होतं सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे बऱ्याच घरात नॉनव्हेज बनवले जात. परंतु तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल,

तुम्हाला घेतलेले पैसे जर परत मिळवायचे असतील तर हा उपाय करताना रविवारी तुम्ही नॉनव्हेज पूर्णतः टाळायलाच हवं. या 27 दिवसांमध्ये जर तुम्हाला पैसा परत मिळाला नाही तरी सव्वा महिन्याच्या आत तुम्हाला तुमचा पैसा हा नक्कीच मिळालेला असेल धन्यवाद.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *