नमस्कार मित्रांनो,
घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. आपल्या समाजात घुबडाविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. घुबडाला सहसा रात्रीचा राजा म्हटले जाते. त्याला चांगलं किंवा वाईट म्हणूनही ओळखलं जातं. शकुन शास्त्रानुसार घुबडाचे दर्शन काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ मानलं जातं.
उदाहरणार्थ जर तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसलं तर ते पैसे मिळण्याच लक्षण असत. पण जर एखादा घुबड घरी आलं तर ते मात्र हानिकारक मानल जात. त्यामुळे घराची प्रगती खुंटते असेही म्हटलं जातं. मित्रांनो आणखी अशाच कोणकोणत्या परिस्थितीमध्ये घुबड दिसणे तर त्याचा काय परिणाम असतो हे आज या माहितीमध्ये आपण बघणार आहोत.
पांढरे घुबड दिसणे चांगले मानले जाते. पांढरे घुबड क्वचितच दिसतो. परंतु जर ते दिसलं तर जीवनातील समस्या सुटतात असं म्हटलं जातं. जर तुमच्या आयुष्यात काही चांगलं होत असेल तर पांढरे घुबड पाहणे स का रा त्म क बातमी मिळण्याचे लक्षण आहे.
तशी अपेक्षा तुम्ही करू शकता. पांढरे घुबड हे मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंधित आहे. जर तुम्हाला पांढरे घुबड दिसलं तर याचा अर्थ असा की, तुमचे पूर्वज तुमच्यासोबत आहेत. मग घाबरण्याची काहीच गरज नाही. घुबडाला सतत पाहणे किंवा घुबडाशी सतत तुमची दृष्टी भेट होणं हे आयुष्यात येणार्या आनंदाची चाहूल देत.
तसेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे सुद्धा त्याच एक प्रमुख लक्षण आहे. दुसरीकडे जर तुम्ही काही कामासाठी जात असाल आणि तुम्हाला डाव्या बाजूला घुबड दिसले तर तो ही शुभ संकेत मानला जातो. असं म्हणतात की तुम्ही ज्या कार्यासाठी जात आहात ते यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
तर उजवीकडे घुबड दिसले तर ते मात्र शुभ मानले जात नाही. याचा अर्थ तुम्ही थोडा वेळ थांबून मग पुढे जा. रात्रीच्या वेळी जागणारा घुबड जर दिवसा दिसले तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा की नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुमच्या जीवनात स का रा त्म क बदल होणार आहेत आणि लवकरच एक चांगली बातमी सुद्धा मिळणार आहे.
दिवसा जेव्हा घुबड दिसते तेव्हा त्याचा एक अर्थ असा सुद्धा असतो की तुमच्या दृष्टिकोनाबदल होणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे की, योग्य निर्णय काय आहे आणि तुम्ही कुठे चुकत अहेसा. दक्षिण-पश्चिम दिशेला घुबड दिसले तर ते आर्थिक संकटाचे सूचक मानले जाते.
दुसरीकडे जर घुबडाचा आवाज पूर्वेकडून येत असेल किंवा जर घुबड त्या दिशेने दिसले असेल तर ते आर्थिक फायद्याचे सूचक मानले जाते. अशी मान्यता आहे की तुमच्या आयुष्यातील आर्थिक संबंधित सर्व समस्या संपुष्टात येतील. जर तुम्हाला दक्षिणेकडून घुबडाचा आवाज ऐकू आला किंवा त्या दिशेने घुबड दिसले तर याचा अर्थ असा की, तुमच्या शत्रूवर तुम्ही विजय मिळवाल.
रात्रीचा राजा घुबड जर तुम्हाला रात्रीच दिसले तर ते शुभ मानले जाते. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजू शकता. तुमची सर्व समस्यांपासून मुक्ती होईल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. जर रात्रीच्या वेळी घुबडाचा आवाज ऐकला गेला तरी याचा अर्थ असा की, येणारे दिवस तुमच्यासाठी चांगले असतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि घुबड जर तुमच्या रस्त्यात आले तर तो एक चांगला शकुन मानला गेला आहे. याचा अर्थ असा की, तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत आणि जुनी कर्ज देखील संपून जातील.
दुसरीकडे जर एखादा घुबड तुमच्या डोक्यावरून उडाले तर हा संकेत तुम्हाला आयुष्यात नवीन मार्गाकडे घेऊन जाणार असतो. जर तुम्हाला स्वप्नात घुबड दिसले तर याचा अर्थ असा की, तुम्हाला लवकरच तुमच्या समस्यांचे समाधान मिळेल. याचवेळी तुमच्यामध्ये ज्ञानवृद्धी होणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू शकता आणि सर्व काही ठीक होईल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.