मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुखशांती असावी कोणत्याही प्रकारचे भांडण, वाद-विवाद नसावेत आपले घर हे कायम हसत खेळत आनंदाचे प्रसन्नतेचे असावे असे वाटत असते. मग त्यासाठी आपण पुरेपूर काळजी देखील घेत असतो. मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये म्हणजेच वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टींची माहिती देखील दिली गेलेली आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होणार नाही.
मित्रांनो वास्तुदोष जर आपल्या घरामध्ये निर्माण झाला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला जीवनामध्ये सहन करावे लागतात. म्हणजेच घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण हे शांततेचे, समाधानाचे असावे यासाठी मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये कायमच आनंदाचे तसेच प्रसन्नतेचे वातावरण राहील.
तर मित्रांनो तुम्ही जेव्हा घर बांधता त्यावेळेस लक्षात ठेवा की प्रत्येक खोलीमध्ये किंवा किमान प्रत्येक बेडरूम मध्ये नैसर्गिक प्रकाश म्हणजेच सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे. जेणेकरून मग आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता नांदते आणि मग कोणत्याही प्रकारचे मतभेद देखील होत नाहीत. तसेच वास्तुशास्त्रानुसार जर उत्तर दिशेच्या भिंतीला कोणत्याही प्रकारच्या जर भेगा असतील तर हे अशुभ मानले गेलेले आहे.
त्यामुळे चीर पडलेल्या भिंतीमुळे अनेक प्रकारचे वाद-विवाद भांडणे आपल्या घरामध्ये होऊ शकतात. कलह होऊ शकतात. त्यामुळे उत्तर दिशेच्या भिंतीला कोणत्याही प्रकारची चीर पडलेली अजिबात असू नये. तसेच आपल्या घरातील जे तुळशीचे रोप असते हे रोप घराच्या उत्तर दिशेला अवश्य लावायचे आहे.
तसेच घरातील झाडू हा आडवा ठेवू नये. यामुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो. शक्यतो करून महिलांचे एकमेकांसोबत अजिबात पटत नाही. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत राहतात. मग जर भांडणे सतत होत असतील तर तुम्ही मेणबत्तीवर तूप आणि गूळ मिसळून रविवारी जाळायचे आहे. यामुळे आपल्या घरातील वातावरण सुधारेल.
तसेच वास्तुशास्त्रानुसार घरातील बेडरूम मध्ये तुम्ही धातूचा बनवलेला पलंग ठेवणे टाळायचे आहे. यामुळे तुम्हाला फक्त झोपण्यासाठीच त्रास होणार नाही तर तुमच्या जोडीदारा सोबत तुमचे अनेक प्रकारचे वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे तणाव देखील निर्माण होऊ शकतो. यामुळे तुम्ही धातूचा बनवलेला पलंग बेडरूममध्ये अजिबात ठेवायचा नाही.
तसेच घरामध्ये दोन बेड आणि स्वतंत्र दोन गाद्या ठेवणे देखील टाळायचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात जेवणाची खोली ही पूर्व, उत्तर किंवा दक्षिण पूर्व दिशेला बनवावी. यामुळे आपल्या घरातील वातावरण हे कायम आनंदाचे आणि प्रसन्नतेचे राहील. तर मित्रांनो तुम्ही देखील या वरील सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या घरातील वातावरण हे कायमच आनंददाचे प्रसन्नतेचे राहील. कोणत्याही प्रकारच्या अडचणी तसेच तुमच्या कुटुंबांमध्ये वाद-विवाद, कलह, भांडणे, कटकटी अजिबात होणार नाहीत. सर्वजण एकोप्याने राहतील आणि प्रेम वाढीस लागेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.