घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल ह्या गोष्टी प्रत्येकाने कटाक्षाने पाळाव्यात… अन्यथा होऊ शकतो अनर्थ !

अध्यात्मिक

श्री स्वामी समर्थ, भगवान गणपती केवळ विघ्नहर्ता नसुन, तर ते बुद्धीदाता आणि समृद्धीकारकही मानले जातात. चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद महिन्यात प्रामुख्याने गणपती चतुर्थी येत असते. त्यामुळे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे.

या गणेश चतुर्थी दिवशी प्रत्येक घरी आपापल्या आवडीनुसार, मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते. मात्र,ही गणपती बाप्पाची मुर्ती आणताना, केवळ मोहून न जाता काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते, असे सांगितले जाते.त्यामुळे काही दिवसातच गणेश चतुर्थी येणार असुन, बरेचसे लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरात करतेवेळी या काही नियमांची काळजी घेणे गरजेचे आहे.

यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भगवान गणपती बाप्पाची मुर्ती एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. जर घरात गणपतीची मूर्ती बसवणार असाल, तर काळजी घ्या की गणपतीची मूर्तीची उंची ही एक फुटापेक्षा जास्त नसली पाहिजे.कारण ही गणपतीची मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता आली पाहिजे, अशी मूर्ती असली पाहिजे.

तसेच शक्यतो सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेला विश्राम अवस्थेतील गणपती बाप्पाची प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते.साप, गरुड ,मासा किंवा युद्ध करताना विचित्र आकारातील गणपतीची मूर्ती घेऊ नये किंवा उभे असलेले गणपती सुद्धा घेऊ नये. तसेच शिव-पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती तर मुळीच घेऊ नये, कारण शिव-पार्वतीची पूजा केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध मानली गेली आहे.

याशिवाय भगवान गणेशाची मूर्ती घरी घेऊन येतांना तिच्या डोळ्यावर पट्टी कधीच बांधू नये.कारण गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही ,तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही.त्यामुळे विधिवत प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्की केली पाहिजे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर, काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास,अजिबात न घाबरता त्या मूर्तीत दही-भात नैवेद्य दाखवून त्वरित, तिचे विसर्जन करावे

आणि दुसरी मूर्ती आणून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावीत,मात्र मनात कोणतीही शंका आणू नये. तसेच कुटुंबात किंवा नात्यात कोणाचा मृत्यू झाल्यास, सुतकातील व्यक्तीऐवजी किंवा शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून गणपती बाप्पाला पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जन घाईगडबडीत अजिबात करू नये.

गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर,घरात वादविवाद, मद्यपान किंवा मांसाहार अजिबात करू नये. गणपती बाप्पाला साधा भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. मात्र चुकनही आंबट-तिखट पदार्थ नैवेद्यमध्ये नसावेत. दही-साखर-भात हा सर्वोत्तम नेवेद्य उत्तम मानला जातो. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ ,मृदंग आणि अभंग म्हणत परमात्म्याला निरोप दिला पाहिजे.

मात्र विसर्जन मिरवणूक अश्लील नृत्य वाजून ,विकृत चाळे अजिबात करू नये. त्यामुळे गणपती बाप्पाचा क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. अशा प्रकारे, तुम्हीही तुमच्या घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली पाहिजे, त्यामुळे गणपती बाप्पाचा कृपा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे याच योग्य पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केली पाहिजे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *