घरात या ठिकाणी ठेवा पिरॅमिड, होईल आर्थिक उन्नती!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो घरात जर वास्तुदोष असला तर आपण पिरामिड चा वापर करत असतो. म्हणजेच की ज्या ठिकाणी जर वास्तुदोष दाखवत असेल तर तेव्हा आपण त्याचा वापर करत असतो. घरामध्ये जर वारंवार भांडण तंटे होत असतील घरातल्यांसोबत आपलं पटत नसेल किंवा एकमेकांचे विचार जर जुळत नसेल तर त्यावेळेस आपण अनेक प्रकारचे उपाय करून पाहत असतो.

पण त्याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही.तर त्यावेळेस तुम्हाला पिरामिड आर्थिक मदत करणार आहे. व त्याच्यामुळे पिरॅमिड ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक उन्नती देखील होणार आहे.तर मित्रांनो घरामध्ये कोणत्या ठिकाणी पिरामिड ठेवल्यानंतर आपल्या घराची आर्थिक उन्नती होणार आहे चला तर आता आपण जाणून घेऊया.

प्राचीन ऋषीमुनींनी अभ्यासापूर्वक वास्तुशास्त्रावर विश्लेषण केल्या त्यांचं हे योगदान अमूल्य आहे.आजच्या आधुनिक जगामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे .अनेकांना त्याचा लाभ ही होतोय संबंधित आहे जास्तीत जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचावी आणि आपल्या उपयोगी ठरतात त्यातलाच उपाय म्हणजे पिरॅमिड कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये आपण एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल ती म्हणजे त्याचं घुमट हे पिरामिड सदृश्य असतात आणि त्याचं काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे.

घरात सजावटीसाठी पिरॅमिड चा वापर करतात घरामध्ये सजावट म्हणून वापरलेला पिरामिड योग्य ठिकाणी ठेवल्यास वास्तुदोष दूर होण्यासही मदत होते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पिरामिड ठेवणे हे खूप शुभ मानले जाते.सर्व सदस्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो असे म्हणतात व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती झाल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात असं सुद्धा सांगितले जातात.

पिरॅमिड मध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तणावग्रस्त किंवा थकलेल्या व्यक्तीने पिरॅमिड जवळ ठेवल्यास त्याचं मन शांत होतं आणि सर्व प्रकारचा थकवा सुद्धा दूर होतो असं सांगण्यात येतात समस्या दूर होतात आणि घरातील वास्तुदोष ही दूर होता त्यानुसार उत्तर दिशेला पिरॅमिड ठेवल्यास ते विशेष फलदायी ठरतं असं केल्यास संपत्तीची वृद्धी होते.

आणि आर्थिक उन्नती सुद्धा होते असे म्हणतात. वास्तु नुसार दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवल्याने हितशत्रूपासून संरक्षण होते. कायदेशीर प्रकरणात अडकलेल्या लोकांनी पिरॅमिड दक्षिण दिशेला ठेवावं त्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे.

पिरॅमिड पूर्व दिशेला ठेवल्यास मान सन्मान आणि कीर्ती वाढते. पिरॅमिड मध्ये पाणी भरून ठेवल्याने चुंबकीय शक्ती त्या पाण्यात परावर्तित होत असते त्यामुळे पिरॅमिडमध्ये भरलेले पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात सध्याचे आजार अंगदुखी हात पाय हे आजार सुद्धा बरे होतात असं सांगण्यात येतात हे पिरामिड मधील पाणी अत्यंत गुणकारी मानलं जात.

सुती कापड पिरॅमिडच्या पाण्यामध्ये बुडवून आपल्याला ज्या ठिकाणी लागलआहे.त्या ठिकाणी लावल्यानंतर आपले दुखणे कमी होते.व आपल्याला त्रास होत नाही. दिवसातून निदान दोन वेळा गुंडाळून लावले.तर अनेक प्रकारचे त्वचेचे आजार दूर होतात असे म्हणतात.

धातूमध्ये पिरॅमिड धार्मिक स्थळी उपलब्ध असतात तसेच लहान मोठ्या आकारात फायबर मध्ये पांढऱ्या रंगांमध्ये ते उपलब्ध होतात मोठे पिरॅमिड वीस ते पंचवीस मिनिट डोक्यावर धारण केल्याने सर्दी पडसे डोकेदुखी यांसारखे आजार तात्काळ बरे होतात असं म्हणतात. मोडलेली हाडी लवकर जोडू शकतात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

घरातील देवघरात तसेच प्रत्येक खोलीत पिरॅमिड ठेवल्याने आपापसात होणारी भांडणे सुद्धा थांबून घरात शांतता नांदते असं म्हटलं जातं. लहान लहान पिरामल झोपताना बाजूला ठेवल्याने आपल्याला छान झोप लागते असे देखील म्हटले गेले आहे. आपण घराचे बांधकाम करणार असेल तर पहिला आपण घराची जागा शुद्ध करून घेत असतो.

त्यासाठी आपण प्लॉटच्या चारही कोपऱ्यामध्ये नऊ नऊ पिरॅमिड आणि मध्यभागी नऊ पिरॅमिड पुरले तर ती जागा दुशमुक्त होते. व आपण तिथे पिरामिड ठेवल्याने ती जागा शुद्ध होते.अशा जागेवर घर बांधल्याने तिथे वास्तुदोष राहत नाही, मित्रांनो हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पिरॅमिड घेता ते नऊ इंच किंवा बारा इंचाची असली पाहिजे याची तुम्ही काळजी घेऊन पिरॅमिड खरेदी करायचे आहे जे मी वरती तुम्हाला उपाय सांगितला आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये उन्नती येणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *