मित्रांनो प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोष्टींवरून वाद-विवाद, भांडण तंटे होत असतात. पैशाच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्याही कारणाने आपले घर हे अशांततेत बदलून जाते. स्वामी म्हणतात ज्या घरात कटकटी होतात, भांडण वाद विवाद होतात त्या घरात कधीच सुख-समृद्धी रहात नाही. लक्ष्मी माता हे बघून घरातून कायमची निघून जाते. त्यामुळे घरात गरिबी, दरिद्रता, अशांती येते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपला परिवारावर होत असतो. आपल्या घरामध्ये भांडण तंटा पाहून लक्ष्मीची कृपा होत नाही.
यामुळे नाती तुटतात. माणसे व्यसनाच्या आहारी जातात. अजून खूप काही होत असते. ज्याच्या घरात असे वातावरण असते त्यांनाच हे सगळे माहीत असते. म्हणून मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा छोट्या-मोठ्या कटकटी होत असतील, भांडणे होत असतील, वाद विवाद होत असेल, नात्यात दुरावा असेल तर यासाठी काय करावे असा सगळ्यांचाच प्रश्न असतो. मित्रांनो काही पीडा, दोष किंवा काही ग्रहदोष असल्यामुळे सुद्धा ही असे होत असते किंवा आपण ज्या घरात राहतो त्या घरात वास्तुदोष असल्यामुळेही असे होते. यासाठी एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे.
हा उपाय तुम्ही नक्की आपल्या घरात करा. याने लगेचच फायदा मिळायला सुरुवात होते. मित्रांनो घरात विनाकारण कटकट होत असेल, भांडण होत असेल, घरातली स्त्री नाराज रहात असेल तर थोडी हळद घ्यावी व थोडे गोमूत्र घ्यावे. या दोघांना एकत्र मिक्स करून घ्यावे आणि ते घरात सगळीकडे शिंपडावे. हळद यासाठी की याने घरातील सर्व दोष दूर होतात.
वाईट शक्ती घरात रहात नाही. त्या हळदीमुळे दूर पळतात. पीडा नाश होतात. गोमूत्र यासाठी की जेव्हा आपल्या घरातून वाईट शक्ती निघून जातात जेव्हा सकारात्मक गोष्टी येतात. तेव्हा हे गोमूत्र घराला पवित्र करते. म्हणून हळद आणि गोमूत्र काही दिवस लगातार न चुकता हा उपाय करावा.
तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातून एकदा दर शनिवारी तरी हा उपाय करावा. याने नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल आणि जर कधी फरक जाणवलाच नाही तर मग एखादा शुभ दिवस बघून पाच सुवासिनी महिलांना बोलवून त्यांचा मानपान करावा. दूध खीर खाऊ घालावी. याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर, आपल्या परिवारावर, आपल्या घरावर होते.
कधीच कोणता त्रास, भांडण, कटकटी होणार नाहीत. तर मित्रांनो हे दोन छोटे उपाय आहेत. मित्रांनो मी जो तुम्हाला आधी उपाय सांगितलेला आहे. गोमूत्र आणि हळद दोन्ही मिक्स करून घरात शिंपडल्याने नक्कीच घरातल्या कानाकोपऱ्यात वाईट शक्ती नकारात्मक शक्ती, इडा पिडा व दोष असतात ते नक्कीच या उपायाने दूर होतात. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करा.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.