घरात वाईट शब्द बोलल्याने काय घडते? वास्तुपुरुष तथास्तु म्हणतात ! श्री स्वामी संदेश.

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

आपण घरातील सर्व सदस्य मिळून एक घर बनलेली असते. घरातील सर्व सदस्य एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. घरातील सर्वांनाच सर्वांबद्दल सर्व काही माहिती असते सर्वांबद्दल प्रेम व आपुलकी असते. परंतु घर म्हटले की, भांडणाला भांडण लागतेच. कधी कधी थोड्या थोड्या गोष्टीवरून खटके उडून त्याचे वादविवाद व भांडणात रूपांतर होते व एकमेकांची मते एकमेकांना पटत नाहीत.

कधी कधी वाद विकोपाला जातात आणि एकमेकांना खूप वाईट साईट बोलले जाते, अपशब्द बोलले जाते. कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की, आपल्याच व्यक्तींना संतापाच्या भरात आपण काहीही बोलून जातो. कधी कधी त्या संतापामागे, त्या बोलण्यामागे आपला काहीही वाईट हेतू नसतो.

आपण आपल्या कामाचा त्रासामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे अगदी निपुण जातो आणि आपला हा त्रास, हेच दुःख संताप बनून आपल्या तोंडातून अपशब्द द्वारे बाहेर पडते. आपण नकळतपणे कधी कधी खूप भयंकर बोलून जातो आणि आपल्याच कुटुंबातील व्यक्तींचे वाईट व्हावे असे बोलत बसतो.

आपण सहज म्हणून जातो तुझं कधी चांगलं होणार नाही, तुला कधीच सुख मिळणार नाही, तू असाच मरशील असाच, तू अन्न अन्न करशील पण तुला अन्न मिळणार नाही. तुझे काम कधीच होणार नाही, तू नेहमी दुःखी, कष्टीत राहशील. पैसा पैसा नको करू पैसा आज आहे तर उद्या नाही. एक ना अनेक कितीतरी प्रकारे आपण एकमेकांना उणेदुणे अपशब्द बोलत असतो.

परंतु आपल्याला हे माहीत आहे का? की, आपले घर म्हणजे वास्तू या वास्तूमध्ये वास्तुपुरुष निवास करीत असतो आणि दिवसातून एक वेळा तथास्तु म्हणत असतो. आपण जर नेमके त्याचवेळी घरातील एखाद्या सदस्याला काही तरी वाईट साईट, काही अपशब्द बोलत असलो तर त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो. सारखे सारखे आपण अपशब्द बोलले गेल्याने त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपणच बोललेल्या शब्दांचे वाईट परिणाम आपल्यासमोर येऊ लागतात.

घरातील सदस्य आजारी पडायला लागतात, उ त्प न्न कमी होते, आ र्थि क समस्या नि र्मा ण होतात, घरात दारिद्र्य प्रवेश करते समाजात आपला मान सन्मान कमी होतो. कधी कधी घरांमध्ये वंश बुडीही होते, अपत्य होत नाही. मुला-मुलींचे विवाह होत नाही. प्र त्ये क कार्यात अडथळे येण्यास सुरुवात होते. हळूहळू आपली परिस्थिती खूपच बिकट होऊन जाते. आपल्याला असे का होत आहे हे समजत नाही?

आपण विचार करतो की, असे हे चक्र उलटे फिरले. सगळे व्यवस्थित होते हे सर्व कसं काय बदलले. आपल्याला वाटते की, आपल्यावर भगवंतांचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे. काळी जादू केली आहे, कोणाला तरी आपले चांगले झालेले सहन झाले नाही म्हणूनच असे होत आहे. परंतु या सर्वांचे मूळ कारण आपण स्वतः आहोत। आपले वाईट बोलणे हे आपल्या लक्षात येत नाही.

आपण स्वतःहून हे संकट स्वतःवर ओढावून घेतलेले असते. आपण जे मागतो जे बोलतो तेच सर्व काही आपल्याला मिळत असते. आपल्या घरातील वास्तुपुरुष प्र स न्न मनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात. परंतु त्यावेळी जर आपण अशुभ व वाईट बोलत असलो तर, आपल्याला तिच फळे मिळतील.

आपण जर घरात सर्वांशी चांगली वर्तणूक ठेवली, सर्वांना चांगलेच बोललो, आपले व इतरांचेही भले व्हावे ही इच्छा केली व तेच सांगितले तर आपल्याला सुख व समृद्धी मिळते.

परंतु कळत-नकळतपणे आपण ज्या काही चुका करतो, जी काही वाईट कर्मे करतो त्याचे वाईट फळे आपल्याला सहन करावे लागतात. म्हणून घरात नेहमी बोलताना चांगले व शुभ बोला. सकारात्मकच बोला म्हणजे जे होईल ते चांगले शुभ व सकारात्मकच होईल. वाईट बाबींचा न का रा त्म क गोष्टींचा त्याग करा आणि जे चांगले शुभ असेल त्याचा स्वीकार करा.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *