घरात शूज आणि चप्पल कुठेही ठेवता; वाचा काय सांगत वास्तुशास्त्र!

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी देखील आपणाला येत नाही घरामध्ये शांतता राहते वाद-विवाद तसेच आर्थिक समस्या किंवा नकारात्मक विचार देखील येत नाही वास्तुशास्त्रांमध्ये प्रत्येक दिशेला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे.

काही वेळेस आपल्या काही चुकांमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो मग आपल्या घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते वाद विवाद भांडणे तसेच आर्थिक समस्या जाणवू लागतात. मित्रांनो, वास्तूनुसार जर घरात ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेला असतील तर नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

वास्तुशास्त्राने घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितलेली आहे. वास्तुशास्त्रामध्ये शूज आणि चप्पल ठेवण्याचे काही नियम सांगितले गेलेले आहेत जर हे नियम आपण जर पाळले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या घरातील वातावरण देखील शांततेचे राहते. चला तर मग वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घरात शूज आणि चप्पल कुठे आणि कशी ठेवणं योग्य मानलं जातं.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तू shoes,slippers ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. घरात शूज आणि चप्पलसाठी शू-रॅक बनवले जाते किंवा जागा निवडून शूज आणि चप्पल नेहमी तिथे ठेवल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा योग्य आहे. या दिशेला शूज आणि चप्पल ठेवणे वास्तूनुसार शुभ मानले जाते.

मित्रांनो, वास्तूनुसार ज्या घरांमध्ये शूज आणि चप्पल इकडे तिकडे म्हणजेच इतरत्र पसरलेले असतात त्या घरातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणे आणि मतभेद होतात. वातावरण हे तणावपूर्ण होते. वास्तूनुसार, घरात कुठेही शूज आणि चप्पल काढण्याची सवय असेल किंवा ती विखुरलेली असतील तर शनीचा दुष्परिणाम माणसाच्या आयुष्यात वाढतो.

वास्तुशास्त्रात पूर्व आणि उत्तर दिशा अतिशय शुभ मानली गेलेली आहे. या दिशेला देव वास करतो. अशा परिस्थितीत चुकूनही शूज आणि चप्पल घराच्या या उत्तर दिशेला दिशेला ठेवू नयेत. शूज आणि चप्पल या दिशेला ठेवल्यास व्यक्तीला आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. वास्तूनुसार, पूर्व आणि उत्तर दिशेकडून जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यासाठी शूज आणि चप्पल दिशेला ठेवू नयेत.

तसेच बरेच लोक हे आपल्या बेडरूममध्ये शूरॅक ठेवतात. वास्तूनुसार बेडरूममध्ये शूरॅक ठेवणे शुभ मानले जात नाही. शूज आणि चप्पल बेडरूममध्ये ठेवल्याने वैवाहिक जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम होतो. घरातील या खोलीत शूज आणि चप्पल ठेवल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत राहतात. त्यामुळे नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण होतो.

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सर्वात खास स्थान आणि महत्त्वाचा भाग आहे. कारण जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा या दिशेतूनच प्रवेश करते.काही लोकांच्या घराच्या मुख्य दारात चप्पलांचा ढीग असल्याचे अनेकदा दिसून येते. वास्तूमध्ये मुख्य दारावर शूज आणि चप्पल ठेवणे शुभ मानले जात नाही. वास्तूनुसार, देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. त्यामुळे मुख्य दरवाजासमोर कधीही शूज किंवा चप्पल अजिबात ठेवू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *