घरात पैसा टिकत नाही तर करा ‘हे’ उपाय लक्ष्मीची कृपा होईल, भरभराटी येईल!

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. पैशाला बरकत राहत नाही पैसा घरामध्ये येतो. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होतो. घरामध्ये पैशा टिकण्यासाठी पैशाला बरकत येण्यासाठी व भरभराटी येण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय पाहणार आहोत. तो उपाय केल्याने पैशाच्या संदर्भात असलेल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत.

आणि आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी राहणार आहे. आपल्याला पैशाच्या संदर्भात जाही काही समस्या असतील त्या समस्या हा उपाय केल्याने दूर होतील हा उपाय करायला आजपासूनच सुरू करा. म्हणजे आपल्या सर्व काही अडचणी दूर होतील घरामध्ये शांतता, समाधान आणि लक्ष्मी येण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वच्छता असायला हवी. कचरा ,जाळी, भंगार अशा बाद झालेल्या वस्तू आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत.

सकाळी दार घर स्वच्छ लोटून काढायचे आहे. दारामध्ये सडा टाकून रांगोळी काढायची आहे. तुळशीची पूजा करायची आहे औदुंबराची देखील पूजा करायची आहे. दररोज देवांची पूजा करावी. देवांना स्नान घालावे व देवघरामध्ये असलेली घंटा वाजवावी. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते. आणि घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते घरामध्ये शांत, समाधान, प्रसन्न वाटते.

तुळशी कट्ट्याच्या उत्तर बाजूस नेहमी दिवा लावावा स्वयंपाक करून झाल्यानंतर गॅस व गॅस चा ओटा स्वच्छ पुसून काढावा. घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक खोल्या स्वच्छ झाडून काढाव्यात. आणि घरामध्ये असणारे सर्व भांडी स्वच्छ करावीत भांड्यांवर धूळ पडणार नाही. याची काळजी घ्यावी भांड्यांवर असणारी धूळ साफ करून घ्यावी. जेवण जेवण झाल्यानंतर जेवलेली खरकाती भांडी लगेचच घासावी.

ज्या जागी आपण जेवायला बसता ती जागा जेवून झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे. जास्त वेळ धुणे न धुता तसेच ठेवायचे नाहीत. कारण जुने हे द्वाड असते घरामध्ये कोणीही उपाशी राहू नये. घरातील प्रत्येक सदस्यांना जेवाय वाढावे. किचन कट्टा, रॅकवरील भांडी महिन्यातून एकदा स्वच्छ करून घ्यावीत. उशी कव्हर, गादी कव्हर लहान मुलांचे अंथरून पांघरून स्वच्छ धुवायचे आहेत.

महिन्यातून एकदा स्वच्छ धुऊन उन्हामध्ये वाळत घालावेत. घरामध्ये असणारे फॅन, कुलर, फ्रिज महिन्य महिन्यातून एकदा साफ करावेत घर स्वच्छ ठेवावे. आपल्या वाडवडिलांनी म्हटलेली एक म्हण आहे. ज्या ज्या ठिकाणी हात फिरे त्या त्या ठिकाणी लक्ष्मी वसे. असे वाडवडिलांनी सांगितलेले आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने घराची स्वच्छता करावी. घर स्वच्छ ठेवावे.

घरामध्ये किंवा घराच्या कोपऱ्यामध्ये जर थोडीशी जरी घाण असेल तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते. त्या ठिकाणी लक्ष्मी माता राहत नाही. म्हणून याच कारणामुळे आपल्या घरामध्ये पैसा राहत नाही. जर घर अस्वच्छ असेल तर आपल्याला उत्तम आरोग्य देखील लाभणार नाही. म्हणूनच घर स्वच्छ ठेवा. घरामध्ये स्वच्छता ठेवा यामुळे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहील.

घरामध्ये पैसा टिकेल बरकत येईल सुख समाधान वाढीस लागेल. आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल. जर घरामध्ये स्वच्छता असेल तर उत्तम आरोग्य धनसंपदा हे सर्व आपल्याला यामुळे मिळणार आहे. घरामध्ये पैसा टिकण्यासाठी माता लक्ष्मी येण्यासाठी वरील लेखामध्ये सांगितलेला उपाय करा. म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *