घरात नकारात्मकता असेल पदरी नेहमी अपयश येत असेल तर करावे ‘हे’ सोपे उपाय: लगेच फरक दिसेल !

राशिभविष्य अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो ज्या व्यक्तींच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्या व्यक्तींचा स्वभाव देखील नकारात्मक होतो. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा हेतू नकारात्मक होतो. आणि अशा व्यक्ती कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या कामाबद्दल नकारात्मक विचार करतात. सदैव नकारात्मक विचार केल्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश येते. अपयश आल्यामुळे मानसिक ताण तणाव वाढतो आणि अशांतता वाटते सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. सकारात्मक विचार देखील त्यांच्या मनामध्ये येत नाही. आणि अशा व्यक्तींना पुरेशी धनप्राप्ती देखील होत नाही.

आपल्या पुरातन परंपरेनुसार असे काही उपाय सांगितलेले आहेत. आणि हे उपाय जर आपण केले तर नकारात्मक विचार कमी होतात. आणि त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी, समाधान वाढते आणि मित्रांनो आपल्या सोबत ही नकारात्मक गोष्टी घडत असतील. त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आणि भरपूर कष्ट करून देखील आपल्याही पदरी अपयश येत असेल. तर या लेखांमध्ये सांगितलेले उपाय करून बघा. यांनी नक्कीच आपल्याला फरक पडेल. ते उपाय कोणते आहेत ते कसे करायचे आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर अंगण झाडून झाल्यानंतर पाण्याचा सडा टाकावा. आणि रांगोळी घालावी. रांगोळी दारासमोर घातल्याने आपले दार सुंदर दिसते. आपल्या मनाला एक वेगळेच समाधान लाभते. मन प्रसन्न होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा कमी होते. जर आपल्या घराच्या दारासमोर रांगोळी असेल तर माता लक्ष्मी व इतर देवी देवता आपल्या घराकडे येतात. आपल्याला आशीर्वाद देतात.

मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे आपण दररोज सकाळी लवकर उठावे लवकर आंघोळ करावी. त्यानंतर तांब्याचा कळस पाण्याने भरून आणावे. आणि त्या शुद्ध पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत. आणि ते पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर घरातील इतर खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती आहे. ती निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो.

तिसरा उपाय दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीच्या रोपट्याला दररोज पाणी अर्पण करावे. हे पाणी अर्पण करत असताना विष्णूचा कोणताही एक मंत्र जप केला तरी चालतो ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप केला तरी चालतो. किंवा इतर कोणतेही विष्णूचे मंत्र आपल्याला माहीत असतील. किंवा येत असतील तर त्या मंत्राचा जप केला तरी चालतो. दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायचे आहे.

चौथा उपाय दररोज देवघरामध्ये तुपाचा दिवा लावावा व कापूर जाळावा. याने घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे. ती या तुपाच्या व कापराच्या वासाने निघून जाते. घरामध्ये तुपाचा दिवा लावला व कापूर जाळला तर आपल्या घराची पवित्रता वाढते. घराचे वातावरण शुद्ध राहते. देवी देवतांचा वास घरामध्ये होतो. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. लक्ष्मीमाता साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होतात. आणि आपल्याला कसल्याही प्रकारची कमतरता राहत नाही.

मित्रांनो वरील लेखांमध्ये सांगितलेले हे चारही उपाय खूप चमत्कारी उपाय आहेत. हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होईल. आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होईल. तसेच आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक भरलेले आहेत. ते देखील हे उपाय केल्याने निघून जातील. आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला अपयश आले आहे. त्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला यश येईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *