🔴घरात जर खूप कटकटी होत असतील किंवा खूप भांडण होत असतील तर हा एक तोडगा करा यानी घरात सुख शांती नांदेल, घरातील प्रत्येक सदस्य हा सुखी होईल आणि समाधानी होईल.

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

🔴घरात जर खूप कटकटी होत असतील किंवा खूप भांडण होत असतील तर हा एक तोडगा करा यानी घरात सुख शांती नांदेल, घरातील प्रत्येक सदस्य हा सुखी होईल आणि समाधानी होईल.

जेव्हा आपल्या घरामध्ये खूप कटकटी किंवा भांडण होत असतात, अशा वेळेस त्या घराचे सगळं काही विस्कळीत होत असते. काहीच काम व्यवस्थित होत नसतात आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास देखील होत नाही. तिथे पैसा सुद्धा टिकत नाही मग अशा घरांमध्ये नकारात्मकता आणि वाईट शक्ती वास करतात आणि मग यामुळे अनेक दोष निर्माण होतात, रोग निर्माण होतात, आजार वाढतात, लोक दुखी होतात. या सगळ्या गोष्टींचे कारण असतं घरात होणाऱ्या कटकटी आणि भांडण. तर हे आपण तात्काळ थांबवलं गेलं पाहिजे. पण थांबवून सुद्धा या गोष्टी थांबत नसतील तर मग यासाठी काहीतरी तोडगे काही उपाय करायला पाहिजे. तर एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. जो काही लोकांना लाभ देणार असू शकतो. कोणत्याही दिवशी हा उपाय करता येईल. फक्त एकदाच करायचा आहे.

यासाठी तुम्हाला फक्त एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि घराच्या बाहेर जायचे आहे. घराच्या बाहेर मुख्य दाराच्या बाहेर उभे राहायचे आणि घरात आपण आत बघतोय असं उभा राहायचे आणि नंतर आपण घराच्या मुख्य दारावरून घड्याळाचा काटा जसा फिरतो तसा आपला हात गोल फिरवायचा आहे. फक्त तीन वेळेस ते तांदूळ आपल्याला गोल राऊंडमध्ये घड्याळाचा काटा फिरतो तसा फिरवायचा आहे. आपण आरती ओवळतो तसे ते तांदूळ ओवाळायचे आहे घराच्या मुख्य दारावरून आणि त्यानंतर ते तांदूळ घराच्या आत जायला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. ते तांदूळ बाहेरच कोणत्याही प्राण्याला, गाईला तुम्ही खाऊ घालायचे किंवा आपल्या छतावर पक्षांसाठी ठेवून द्यायचे. घराचा आत ते पुन्हा घेऊन जायचे नाही.
हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता.

याच्यासोबत तुम्ही जर अजून एक उपाय रोज केला तर त्याने सुद्धा तुमच्या घरात फरक जाणवेल. तो म्हणजे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये कालभैरव अष्टक दिलेले आहे. हे कालभैरवाष्टक रोज संध्याकाळी देवपूजा करताना तुम्हाला एक वेळेस वाचायचे आहे. अगरबत्ती दिवा लावून देवघरा समोर बसून कालभैरवाष्टक तुम्हाला वाचायचे आहे. याने आपल्या घराचे रक्षण होते आणि कोणतीही अडचण कोणतीही संकट आपल्या घरावर येत नाही.

तर हे दोन उपाय आहेत ज्याने कटकटी भांडण कायमचे संपतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *