🔶 घरात करा हे ४ सोपे उपाय तुम्हाला सुख समृद्धी शांती आणि समाधान लाभेल :

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

🔶 घरात करा हे ४ सोपे उपाय तुम्हाला सुख समृद्धी शांती आणि समाधान लाभेल :

१) खाण्या पिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा नक्की लावावा परिणामी आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते.

२) अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दहीभात कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद मोरीच्या कट्ट्या वर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती तृप्त होऊन सुख-समृद्धी लाभते आणि आपल्या घरातील पितृदोष किंवा आपल्यावर असलेले अनेक दोष नाहीसे होतात व घरात सकारात्मकता आणि आनंदी वातावरण निर्माण होते.

३) रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याचा वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे यांनी आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात कसलीही कमी पडत नाही.

४) प्रत्येक शनिवारी व अमावस्यापौर्णिमेला गोमूत्रामध्ये हळद टाकून त्याच्या पट्टा उंबरठ्यावर ओढ़ावा यानी करणी, अदृश्य शक्ती घरात असल्यास ते घर सोडून दूर जातात व बाहेरून येणाऱ्या शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही याने घरात नकारात्मकता, वाईट शक्ती घरात कधीच प्रवेश करत नाही.

तर हे छोटे छोटे चार उपाय आहेत याने तुमच्या घरात शांती निर्माण होईल, समाधान निर्माण होईल, सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल. हे छोटे छोटे उपाय तुम्हीही तुमच्या घरात नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *