मित्रांनो बरेच लोक नित्यनियमाने देवपूजा करतात. बरेच जण हे काहीही पैशासंबंधी अडचणी येते त्यावेळेस अनेक प्रकारचे टोटके, उपाय करीत असतात.असे हे उपाय करून देखील आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई कायमच राहते. पैसा खर्च होत जातो. अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात.
यामुळे मग आपण कोणतेही उपाय करत नाही. आपला देवावरचा विश्वास उडतो. अनेक जण मग देवपूजा करणे देखील बंद करतात. परंतु मित्रांनो अशा या समस्या आपणाला येण्यामागे आपण देखील जबाबदार असतो. म्हणजेच मित्रांनो आपल्या हातून अशा काही अनेक चुका, गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपल्याला अशा विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.
परंतु या चुका किंवा गोष्टी कोणत्या आहेत हे आपणाला माहीत नसल्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. त्याचा प्रभाव तुमच्या नशिबावर थेट होत असतो. तर मित्रांनो आपल्या काही चुकांमुळे आपल्या घरात आलेली लक्ष्मी ही परत निघून जाते. वास्तुदोष आपल्या घरामध्ये निर्माण होतो आणि या सर्वांचा परिणाम मग आपल्या जीवनावर होत राहतो.
तर मित्रांनो तुम्हाला मी आज अशा काही तुमच्या चुका सांगणार आहे या चुका तुम्ही अजिबात करायचा नाही आणि जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या घरामध्ये बरकत राहील. तुमची प्रगती होत राहील. घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील आणि पैसा तसेच घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी नांदेल.
जाणून घेऊयात कि घरात लक्ष्मी येण्यासाठी तुम्ही नक्की हिंदू धर्म शास्त्रातील कोणत्या नियमांचे आपणाला पालन केले पाहिजे. सर्वात महत्वाचा पहिला नियम म्हणजे घराचा मुख्य दरवाजा, घराचे मुख्य प्रवेशद्वार हा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावा आणि अगदी काही दिवसांच्या अंतराने दरवाजाला सुंदर तोरण सुद्धा असावे.
विशेष करून आंब्याच्या पानांचे तोरण घरात सकारात्मक ऊर्जा आणते.तसाच जो उंबरठा आहे या उंबरठ्यावरती माता लक्ष्मीची पाऊले असावी आणि ती आतमध्ये येणारी असावी. अनेक जण लक्ष्मीची पाऊले लावतात. मात्र ती बाहेर जाणारी असतात अशाने घरातील पैसा बाहेर जातो.
तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती अगदी सुंदर असे ओम चे चिन्ह किंवा स्वस्तिक असावे. स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूस दोन दोन रेषा काढणे विसरू नका.जेणेकरून स्वस्तिक चा प्रभाव तुमच्या दरवाजावरतो कायम राहतो.स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही कुंकू घेऊन त्यात थोडेसे तूप टाकू शकता.
तुम्हाला त्याचा फरक जाणवेल कि, घरात काही दिवसातच शुभ आणि मंगल घडून येईल. मित्रांनो स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळद आणि पाणी याचा सुद्धा वापर करू शकता. तसेच स्त्री म्हणजे घरातील महिला हि प्रत्यक्ष माता स्वरूप असते आणि ज्या घरात महिलांचा अपमान होतो , त्यांना मारहाण होते , महिलांचा छळ होतो अशा घरात पैसा कधीच टिकत नाही.
अशा ठिकाणी तुम्ही कितीही मेहनत केली तरी लक्ष्मी टिकत नाही. घरातील झाडू सुद्धा खूप महत्वाचा असतो. झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो आणि म्हणून तो कोणालाही देऊ नये. घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा कि तिथे कोणाची नजर पडणार नाही.
देवपूजा नित्य नियमाने करावी. करायला हवी. जेव्हा तुम्ही जेवण करण्यासाठी बसता तेव्हा समोर आलेल्या अन्नाला तुम्ही प्रणाम करून जेवण सुरु करा. जेवण झाल्यानंतर ज्या ताटात तुम्ही जेवलेले आहात त्या ताटात हाथ धुणे हे अक्षम्य पाप आहे.
त्या ताटामध्ये हाथ धुवू नये.
या चुकीमुळे अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात आणि अनेक समस्या वाढीस लागतात. तसेच रात्रीचे जेवण झाल्यांनतर जी भांडी खरकटी पडतात ती लगेच स्वच्छ धुवून ठेवावी.किचन हि जी जागा आहे ती अन्नपूर्ण लक्ष्मीची जागा आहे आणि ती जर अस्वच्छ असते तेव्हा त्यातून रोगराई निर्माण होते.
घरात मिठाची बरणी जी आहे ती प्लास्टिकची वापरू नका. मिठाची बरणी हि नेहमी काचेची किंवा चिनी मातीची असावी आणि त्यात कायमस्वरूपी एक किंवा २ लवंगा ठेवत जा आणि प्रत्येक १५ दिवसांनी या लवंगा बदलत राहा.
तुम्हाला स्वतःला जाणवेल कि हळूहळू घरात बरकत होत आहे. गुरुवारचा दिवस सोडून जेव्हा तुम्ही घरातील फरशी पुसून काढता तेव्हा पाण्यात एक चमचा मीठ जरूर टाका. अशा मिठाच्या पाण्याने पुसलेली फरशी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो.
भोजन करताना सर्वानी मिळून मिसळून भोजन करावे. जेवताना कधीच भांडू नका.अशाने अन्नपूर्णा देवीचा तर अपमान होतोच आणि त्यामुळे माता लक्ष्मी येत नाही. तर मित्रांनो असे हे वास्तुशास्त्रांमध्ये काही सांगितलेले नियम आहेत. या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि लक्ष्मीचा वास घरामध्ये कायम राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.