घरासमोर पाणी शिंपडल्याने काय घडते ? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रथा परंपरा अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. पूर्वीचे लोक अगदी या प्रथा परंपरा खूपच काटेकोरपणे पाळत असत. परंतु आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण हा आपल्या कामांमध्ये व्यस्त झालेला आहे. म्हणजेच या प्रथा परंपरा यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

या प्रथा परंपरा म्हणजे त्यांना अंधश्रद्धाच वाटतात आणि याकडे ते विशेष लक्ष देखील देत नाहीत. आपल्या वेळेनुसार ते कोणतीही कामे करत राहतात. परंतु या प्रथा परंपरा मागे काही ना काही गुपित हे दडलेले असते. ज्यामुळे पूर्वीचे लोक ते पाळत असत. पूर्वीचे लोक हे सकाळी लवकर उठून अंघोळ आटवून घरासमोरील अंगण स्वच्छ करून त्या ठिकाणी पाणी शिंपडत होते.

परंतु आजकाल हे आपणाला खूपच कमी पाहायला मिळते. तर घरासमोर पाणी शिंपडल्याने नेमके काय घडते? याबद्दलची मी तुम्हाला माहिती आज सांगणार आहे. सकाळी लवकर उठून पाणी शिंपडणे यामागे खूपच शास्त्रीय कारणे आहेत. तर आपले घर नेहमीच स्वच्छ असावे तसेच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे हा देखील स्वच्छ आपण ठेवायला हवा.

म्हणजेच कोणत्याही प्रकारचा कचरा आपल्या मुख्य दरवाजासमोर अजिबात ठेवू नये. त्यामुळे मग मात्र लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्यापैकी बरेच लोक हे कामांमध्ये खूपच व्यस्त असल्यामुळे ते आपल्या घराकडे दुर्लक्ष करतात.

म्हणजेच त्यांना वेळेअभावी आपले घर अस्वच्छ ठेवावे लागते व त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी संकटे येतच राहतात व त्यावेळेस हे आपल्या जीवनामध्ये का घडते हे देखील कळत नाही. परंतु आपल्या चुकांमुळे हे सर्व आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आपले घर आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील.

जुन्या काळातले लोक हे खूपच दीर्घायुष्य जगायचे. ते अगदी सगळे नियम पाळत असत. मित्रांनो कोणत्याही चांगल्या, शुभ गोष्टी हे आपल्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करत असतात. त्यामुळे माता लक्ष्मी आपले जर घर अस्वच्छ बघेल त्यावेळेस ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही.

तसेच तुम्ही जर मुख्य दरवाजासमोर कोणतीही घाण किंवा कचरा ठेवला तर यामुळे देखील माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत नाही.

त्यामुळे माता लक्ष्मी ज्या घरामध्ये स्वच्छता असेल परिसर स्वच्छ असेल त्या ठिकाणी प्रवेश करते आणि त्याच घराची प्रगती सुद्धा लवकर होते. तर घरातील महिला यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या दाराच्या उंबरठ्यावर तांब्याच्या कलशात गंगाजल घेऊन ते शिंपडावे. जर गंगाजल नसेल तर तुम्ही आपल्या घरातील स्वच्छ पाणी घेऊन शिंपडले तरीही चालेल.

मित्रांनो रात्रभर जी नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावर असते ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणजेच ती आपल्या घरात येण्यापासून थांबवायचे असेल तर तुम्ही पाणी अवश्य शिंपडायचे आहे. तसेच मित्रांनो आपल्या अंगणामध्ये तुम्ही शनिवारी आणि रविवारी थोडे पाणी शिंपडायचे आणि त्यानंतर झाडून काढावे.

यामुळे आपल्या घरावर असलेली जी काही नकारात्मकता असते ती दूर होते. प्रत्येक सोमवारी मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण करून लावावे. म्हणजेच आंब्याच्या पानांचे तोरण करून आपल्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे. यामुळे घरातील लोकांचे जे आरोग्य असते ते आरोग्य चांगले राहते.

तसेच आपल्या घरातील जी फरशी पुसत असताना तुम्ही पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून पुसावे. यामुळे घरातील वातावरण शांततेचे प्रसन्नतेचे राहते. तसेच आपल्या घरातील मुख्य जो दरवाजा आहे त्या दरवाजावर तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा एखादा फोटो लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस मोरांची तीन पिसे लावावी. यामुळे वास्तुदोष दूर होतो. त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणत्याही हिंसक प्राण्यांचे चित्र लावू नये.

तर मित्रांनो तुम्हालाही आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा तसेच घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ही दूर व्हावी असे जर वाटत असेल तर आपल्या घराच्या अंगणात तुम्ही पाणी शिंपडायचे आहे. तसेच आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावर देखील तुम्ही पाणी शिंपडायचे आहे. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मकतेचा वास राहतो आणि आपली प्रगती देखील होत राहते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *