मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतेच आणि या देवघरांमध्ये विविध प्रकारच्या देवी-देवतांच्या मुर्त्या, फोटो आपणास पहावयास मिळतात. सगळेच जण दररोज सकाळी देवपूजा हे करीत असतात. मित्रांनो आपल्या देवघरात असणाऱ्या देवी देवतांच्या मुर्त्यांपैकीच अन्नपूर्णेची मूर्ती देखील असते. ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण कशा प्रकारे ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल तसेच सुख समाधान मिळेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
बरेचजण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती खरेदी करून आणतात. तर मित्रांनो अन्नपूर्णेची मूर्ती ही फक्त अंथरलेल्या कपड्यावरती ठेवायची नाही. तर मित्रांनो एका वाटीमध्ये तुम्ही तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहे आणि या तांदळावरती किंवा गहू घेतले असेल तर त्या गहूवरती हळदीकुंकू वहायचे आहे. या धान्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा ठेवायचे आहे.
जर मित्रांनो तुम्ही दररोज देवपूजा करत असाल किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही देवपूजा करत असाल तर त्यावेळेस तुम्ही त्या तांदळामधील किंवा गहूमधील थोडेसे तांदूळ किंवा गहू हे आपल्या दररोजच्या खाण्याच्या धान्यांमध्ये मिक्स करायचे आहे आणि राहिलेले संपूर्ण धान्य तुम्ही पक्षांना खाऊ घालायचे आहे.
तुम्हाला हे तांदूळ किंवा गहू बदलत राहायचे आहे म्हणजे तांदूळ आणि गहू तुम्ही कोणतेही धान्य घेतलेले असेल ते पक्षांना खायला घातल्यानंतर तुम्हाला नवीन तांदूळ किंवा गहू त्यानंतर वाटीमध्ये घेऊन त्यावर अन्नपूर्णेची मूर्ती स्थापन करायची आहे. हे तांदूळ किंवा गहू तुम्हाला बदलत राहायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर अन्नपूर्णेची स्थापना केली म्हणजे मूर्ती ठेवली तर अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद आपल्या वास्तूवर, आपल्या घरावरती कायम राहतो. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील. आपल्या घरामध्ये कायम सुख समाधान प्राप्त होईल.
तर मित्रांनो तुम्ही देवघरांमध्ये पूजा करीत असताना म्हणजे सकाळी, संध्याकाळी किंवा दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी जेव्हाही तुम्ही देवपूजा करत असाल त्यावेळेस तुम्हाला त्या वाटीतील तांदूळ थोडेसे आपल्या धान्यांमध्ये घालून राहिलेले शिल्लक हे पक्षांना खाऊ घालायचे आहे आणि त्या वाटीमध्ये परत नवीन तांदूळ घालून अन्नपूर्णा स्थापित करायचे आहे.
तुम्हाला जर दररोज देवपूजा जमत असेल तर तुम्ही दररोज हे धान्य बदलायचे आहे. जर काहींना दररोज देवपूजा करणे शक्य नसेल त्यांच्या सोयीनुसार त्यांनी देवपूजा करत असतील तर अशा लोकांनी त्यांच्या सोयीनुसार जेव्हा ही देवपूजा करतील त्यावेळेस हे धान्य बदलायचे आहे.
तर मित्रांनो तुम्हाला देखील अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा, घरात लक्ष्मी नांदावी, आपले घर राहावे असे जर वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णेच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. जेणेकरून त्याचा आपल्याला लाभ मिळेल. त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.