घराच्या कोणत्या दिशेला असावी अभ्यासाची खोली? उघडतील यशाचे मार्ग!

वास्तूशास्त्र अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. तसेच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे जर आपण पालन केले तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण किंवा संकटे यांचा सामना आपल्याला करावा लागत नाही. आपण प्रत्येकजण आजकाल घर बांधताना वास्तुशास्त्राचा अभ्यास करूनच त्यासारखे घराची रचना करत असतो. परंतु काही वेळेस आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती घेतल्या न कारणाने आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होतो.

वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला घराची रचना कशी असावी घरातील प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक वस्तूंचे स्थान हे कोणत्या दिशेस असावे याविषयी संपूर्ण माहिती पाहायला मिळते. कारण एखादी जरी वस्तू अयोग्य दिशेला जर आपण ठेवले तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर पाहायला मिळतो.

म्हणजे एक प्रकारचा वास्तुदोष निर्माण होतो. मग आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येन्यास सुरुवात होते.तर आज मी तुम्हाला आपल्या घरातील अभ्यासाची खोली ही नेमकी कोणत्या दिशेला असावी जेणेकरून आपणाला आपल्या यशाचे अनेक मार्ग मोकळे होतील हे सांगणार आहे. तर चला जाणून घेऊयात अभ्यासाची खोली ही नेमकी आपल्या घराच्या कोणत्या दिशेला असावी.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जो रंग असेल दिशा असेल यांची योग्य ती काळजी आपण जर घेतली तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होते. तसेच आपण आपण आपल्या जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो व आपणाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते.

तर वास्तू तज्ञांच्या मध्ये आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा आहे हा मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा उत्तर- पूर्व दिशेला असावा. म्हणजेच आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपले तोड हे उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असेल.तसेच आपल्या घरातील जो दिवाणखाना आहे हा दिवाणखाणा पूर्व उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असायला हवा.

तसेच त्या खोलीतील फर्निचर पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे कायम सकारात्मकतेने राहते. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद घरामध्ये होत नाहीत. आपापसामध्ये एकोपा राहतो आणि प्रत्येक जण एकमेकांचे विचार सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घेत राहतात. यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल.

तसेच वास्तु तज्ज्ञांच्या मते चांगले आरोग्य आणि चांगले संबंध ठेवण्यासाठी बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी. ईशान्य दिशेला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, तर आग्नेय दिशेला असलेल्या बेडरूममुळे नातेसंबंधात कलह निर्माण होतो. याशिवाय पलंग खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावा. त्याचे डोके पश्चिमेकडे असावे.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील जी मुले आहेत या मुलांच्या अभ्यासाच्या खोलींची रचना ही नैऋत्य दिशेला असणे खूपच शुभ आणि फलदायी मानले गेलेले आहे. यामुळे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करतात. त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष देखील राहते. अगदी एकाग्र मनाने ते अभ्यास करतील आणि प्रगतीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू राहील.

तसेच मुलांनी दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोके ठेवून झोपावे. यामुळे आपल्या मुलांना मनशांती प्राप्त होते. तसेच ते तणाव मुक्त कायम राहतील आणि त्यांच्या नशिबाच्या दृष्टीने देखील हे खूपच फायदेशीर ठरते. वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगाचे देखील खूपच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणजेच आपल्या घरामध्ये गडद रंगाचा वापर करणे टाळायचे आहे.

जर तुम्हाला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी असे जर वाटत असेल तर तुम्ही पांढरा, मलई, पिवळा, गुलाबी, हिरवा, केसरी किंवा निळा रंग वापरायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील वातावरण कायमच प्रसन्नतेचे राहील व सर्वजण सकारात्मकतेने एकोप्याने राहतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *