एकादशीला देवाला नैवेद्य द्यायचा की नाही? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक माहिती

हिंदू धर्मामध्ये एकादशी सर्वजण करत असतात. मुख्यत करून ज्यांच्या गळ्यामध्ये माळ असते ते तर करत असतातच. एकादस महिन्यातून दोनदा येते व ज्या मोठ्या एकादशी असतात त्या वर्षातून फक्त दोनदाच येतात एकादशी पूर्ण एक दिवस आपण फराळ करायचा असतो म्हणजेच की खिचडी किंवा फळे खायचे असतात व आपल्याला एकादशी दुसऱ्या दिवशी सोडायचे असते.

मग आपण खिचडी किंवा फळे हे नैवेद्य दाखवू शकतो का. आपल्याला प्रश्न पडलेला एकादशीला देवाला नैवेद्य चालतो का मी एकादशीला देवाचा उपवास असतो का याची माहिती मित्रांनो आता आपण जाणून घेऊया.एकादस केल्याने अनेकांना फळ प्राप्ती झालेली आहे. श्रद्धेने व भक्तीने एकादशीचे व्रत करतात.

पण फक्त आपल्याला एकादस केल्यानंतर कोणतेही पुण्य मिळेल या भावनेने आपण कधीही एकादस करू नये. मनामध्ये आपण फक्त आपल्या श्रद्धेने आपल्याला एकादस करायची आहे.आपल्याला कोणता लाभ मिळावा म्हणून आपण कधीही एकादस करू नये. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. पहिल्या पंधरा दिवसांमध्ये ही शंकरांची एकादस आहे. दुसऱ्या पंधरा वड्या भागवत ही देव विष्णूंची एकादस आहे.

हिंदू धर्मातल्या सर्व महिन्यात चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असते. अमावस्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरा दिवसात शुक्लपक्ष आणि पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवड्यात कृष्णपक्ष असते.या चंद्र वर्षाप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात. प्रचलित कथेनुसार महाभारतात युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने गौत्रवध देशाच्या नाशासाठी काय करायला पाहिजे.

असे कृष्णाला विचारले त्यावेळेस कृष्णाने एकादशी व्रत केल्यास गौत्रहत्या नाहीशी होईल असे सांगितले आहे. या व्रताचं आचरण केले असता महापथकाचा नाश होतो. व दोष नष्ट होतात असे देखील सांगितले आहे.पौराणिक कथेनुसार मानवावर व्रत वैकल्याचे संस्कार असले पाहिजे. व ते होतात देखील.

व्रत करण्याची पद्धत प्रत्येकांची वेगवेगळी असते पण एकादशीला पाणी फक्त पिऊन तोंडामध्ये साखर ठेवल्यास ते एकदम सर्वोत्तम मानले जाते.ते जर तुम्हाला शक्य होत नसल्यास उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी देखील चालू शकत.आणि एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे करतात मात्र अनेक जण एकादशीला नैवेद्य दाखवत नाहीत हे चुकीचं मानलं जात.

भक्ताने केलेला उपवास भगवंताच्या म्हणजेच की देवाच्या उपासनेसाठी असतो. देवी भक्तांच्या समवेत राहत नाही. आपण दररोज न चुकता देवाला नैवेद्य दाखवावा उपवासाचे निमित्त भक्तांना असते देवांना नाही कारण चैत्रशुद्ध एकादशी आणि श्रावणी शुद्धी एकादशी पंढरपूरच्या विठू रायाला एकादशी दिवशी वरण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.

यामागे काही शास्त्र नसलं तरी याचा अर्थ एकच होतो भक्तांना उपवास असतो देवांना नाही.त्यामुळे आपल्याला एकादशीचे पूजन करून आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. घरामध्ये जर सगळ्यांचा उपवास असेल तर तुम्ही वेगळा नैवेद्य करण्याची आवश्यकता नाही.

नियमाप्रमाणे म्हणजेच आपण जे आपल्याला खायला केलेलं असतं ते देखील आपण निवेद्य दाखवला तरी चालू शकतो. एकादशीची व्रत करण्यामागे कारण असे आहे की पंधरा दिवसातून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तुमच्या शरीराच्या दोषांना जाळून टाकतो. दररोज जो आपल्या शरीरामध्ये आहाराचा म्हणजेच जेवणाचा जो रस पडतो. त्यामध्ये एकादशीच्या उपवासाचा महिमा असतो असे सांगण्यात आले आहे.

कारण एकादशी स्वर्ग मोक्ष आरोग्य चांगली पदवी आणि चांगली पुत्र देणारे एकादश आहे .ममता दया काशी पुष्कर यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येत नाही. असे म्हटले जाते एकादशीला विष्णूचा दिवस असतो. असे समजले जाते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एकादशीला घरामध्ये जर निवेद्य दाखवत नसेल तर तुम्ही ते मी सांगितल्याप्रमाणे एकादशीला नैवेद्य दाखवू शकता व एकादशीला आहे देवांचा उपवास नसतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *