नमस्कार मित्रांनो,
स्वामींनी आपल्या कारकिर्दीत कधीच सोळ्या ओवळ्या ला महत्व दिले नाहीत. त्याची त्यांना अत्यंत चीड होती. एखाद्या अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपलं दर्श घेत आहे असे दिसताच ते स्वतः उठून त्या बाई कडे जात आणि तिला आपल्या हातानी प्रसाद भरवत असत.
विटाळशी ह्या शब्दाचा त्यांना फार राग होता. ते म्हणत बाई हि आई आहे आणि आई कधीच विटाळशी होऊच शकत नाही. तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता. त्याच संदर्भातील आज एक गोष्ट आज या लेखात सांगणार आहोत.
स्वामींचा परम भक्त चोळप्पा सगळ्यांना माहित असेलच. त्याने एकदा घरी सत्यनारायणाची पूजा करण्याचा संकल्प केला. रीतीप्रमाणे चोळप्पा स्वामींची परवानगी घ्यायला मठात पोहचला. स्वामींना त्याने नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सांगितले आणि त्यांची परवानगी मागितली.
स्वामीही खुश झाले आणि म्हणाले, ” चोळ्या सत्यनारायण घालतोस छान, पण प्रसादाचे जेवण मी आणणार.” चोळाप्पाने स्वामींची आज्ञा मनाली व प्रसन्न मानाने घरी पोहचले. आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातील मुहूर्त ठरवला.
पूजेचे तैयारी करण्यात चोळाप्पाचे कुटुंब गुंतून गेले. पूजेचे दिवस उजाडला. प्रसादाची काहीच तैयारी करायची नाही म्हणून चोळप्पा थोडा अस्वस्थ होता. पण स्वामी प्रसाद आणेल म्हटल्यावर प्रश्नच नव्हता.
पूजेच्या तेरा दिवस अगोदर स्वामींचे अक्लकोट मध्ये एक व्यक्ती चाळेकर म्हणून त्यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशीच त्यांचे तेरावे होते. इकडे स्वामींना तेराव्याचे जेवायला कसे बोलवायचे म्हणून चाळेकर द्विविध मनस्थिती मध्ये होता.
इकडे पूजा संपत आली. स्वामींनी भक्तांना पाठवून तेराव्याचे जेवण मागवून घेतले. ते जेवण घेऊन स्वामी चोळप्पाच्या घरी पोहचले. सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सगळे मुक्कट पणे जेवले. स्वामींसमोर बोलायची कोणाचीही ताक नव्हती. अशीच सोहळ्या ओहळयाची दुसरी गोष्ट.
राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्तिन होती. तिच्या मनात गुरु चरित्र मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून च सुरुवात करावी असे ती विचार करत होती. तिच्या समोर २ अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि तिची मासिक पाळी त्याच आठवड्यात होती.
काय करावे तिला समजेना. शेवटी ती स्वामींना भेटायचे ठरवले. ती स्वामींकडे पोहचली. स्वामींना नमस्कार करून काही विचारण्याच्या आतच स्वामी गर्जले, “राधे हि अडचण हि अमावस्या सर्व तुमच्या लोकांसाठी, आम्हाला याचे काही नाही. आमच्याकडे बघ. स्वच्छ आणि लखलखीत. जा आंही गुरुचरित्र वाच.
आणि हो वाचण्याआधी माझ्यासाठी एक पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस. आणि वाचून झालं कि ते दूध पिऊन टाक. अडचण वैगरे काही नाही. जा आता.” स्वामींनी सांगितल्या प्रमाणे गुरुचरित्र मांडले. आणि रोज पेलाभर दूध सुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.