दिवाळी येण्याआधी देवघरातून या पाच मूर्तीचे किंवा फोटोचे विसर्जन करा!

अध्यात्मिक

मित्रांनो दिवाळी हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो. हा सन आपण सगळेच खूप उत्साहात साजरा करत असतो. मित्रांनो दिवाळी घेण्याआधी आपण घर स्वच्छ करत असतो. आपले देवघर स्वच्छ करत असतो. नवीन वस्तू आणत असतो. घराची सजावट करत असतो.

मित्रांनो दिवाळी येण्याआधी देव घरातून या पाच मूर्ती किंवा पाच फोटोंचे तुम्ही विसर्जन करा. चुकुन आपल्याकडून असे फोटो ठेवले जातात. त्यांची पुजा-अर्चना सुद्धा केली जाते. याचे परिणाम हे वाईट होऊ शकतात किंवा काहीतरी आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून जर तुमच्या देवघरात सुद्धा या मुर्त्या किंवा या फोटो असतील तर नक्कीच त्यांचे विसर्जन करा.

आता कोणत्या मुर्त्या आहेत? कोणते फोटो? हे आपण पाहू. महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती. तुमच्या घरामध्ये महादेवाचा फोटो, मूर्ती असेल तर लगेच त्यांचे विसर्जन करा. महादेवाची फक्त पिंड पुजली जाते हे तुम्ही लक्षात ठेवा. आता दुसरं हनुमानाच्या फोटो किंवा मूर्ती. हनुमानाचा सुद्धा फोटो आणि मूर्ती पुजली जात नाही. देव घरात ठेवायची नाही. हनुमान फक्त मंदिरात असतात त्यांची पूजा फक्त मंदिरात केली जाते. घरात नाही.

तर तुमच्या घरात हनुमानाची मूर्ती असेल तर तुम्ही विसर्जन करून घ्यावे. तिसरी गोष्ट लक्ष्मी माता उभी असलेली मूर्ती. लक्ष्मी माता कधीही बसलेल्या स्वरूपात असावी आणि तिच्या आजूबाजूला दोन हत्ती असावे. लक्ष्मी माता उभी असेल किंवा कोणत्या प्राण्यावर बसलेली असेल तरीही त्या फोटोचे त्या मूर्तीचे विसर्जन करावे.

नंतरची गोष्ट आहे कोणत्याही देवांच्या तुमच्या देवघरात असलेल्या मोठ्या मुर्त्या. कोणत्याही मुर्त्या मोठ्या म्हणजे तुमच्या हाता पेक्षा मोठ्या असतील तर त्यांचे सुद्धा तुम्ही विसर्जन करावे. जास्त मोठ्या मुर्त्या देवघरात पूजल्या जात नाही. त्या फक्त मंदिरातच पूजल्या जातात. तर या मुर्त्यांचे विसर्जन करायचे असेल तर एखादा दिवस निवडावा. त्यादिवशी त्या फोटोना फुले वहावीत.

अगरबत्ती व दिवा लावावा आणि गोड-धोड काहीतरी बनवावे आणि प्रार्थना करावी पूजा करावी. आरती करावी. त्यानंतर त्या देवांचे विसर्जन आपण करू शकतो. त्यांचे विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यात करू शकतात किंवा कोणत्यातरी मंदिरात जाऊन त्यांना ठेवू शकतात. अशा रितीने तुम्ही विसर्जन करू शकता. मित्रांनो दिवाळी येण्याआधी तुम्ही ह्या पाच मूर्ती किंवा पाच फोटो तुमच्या देवघरातून काढून त्यांचे विसर्जन नक्की करा.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *