दिवसाची सुरुवात चुकूनही अशी करू नका

माहिती अध्यात्मिक

दिवस चांगला जाण्यासाठी दिवसाची सरुवात चांगली होणं महत्त्वाचं नाही का? ती सुरुवात चांगली व्हावी म्हणूनच तुमच्यासाठी काही खास टिप्स. दिवसाची सुरुवात काही गोष्टी पाहून होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्यावी. तरच तुमचा दिवस चांगला जाईल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

दिवस खराब गेला की त्याच खापर फोडताना एक वाक्य आपण हमखास म्हणतो आज सकाळी कोणाचं तोंड बघितले काय माहिती. परंतु वास्तुशास्त्र सांगत की सकाळी उठल्यावर ठराविक व्यक्तींच नाही तर काही गोष्टींच सुद्धा दर्शन टाळले पाहिजे. आता चुकामुक झालीच तर त्या गोष्टींची काळजी नको का घ्यायला? सकाळ प्रसन्नतेची झाली तरच दिवस प्रसन्न जातो.

यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टींचे दर्शन घेण्यासाठी आपल्या हातांचे दर्शन घ्यावं असं सांगितलं आहे. आता हाताच दर्शन का घ्यायचं? तर आपण हाताने दिवसभर काम करतो, आपल्या हातामध्ये श्रीकृष्ण, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती या देवतांचा वास असतो.

त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलेच घडावे यासाठी प्रभाते करदर्शनम आणि जमिनीवर पाय ठेवणे आधी तिला नमस्कार करावा असं सांगण्यात येतं. आपण आत्ता ह्या गोष्टींचं अनुसरण करू शकतो.त्याचबरोबर आपल्याला वास्तुशास्त्राने सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आरसा.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये. कारण सकाळी आपण आळसवलेले असतो. आपण स्वतःला आळसवलेले पाहिले तर आळस अजूनच अंगावर येऊ शकतो. त्यासाठी सकाळी उठल्यावर प्रथम आरशात न पाहता आधी चेहरा स्वच्छ धुवावा, मरगळ झटकून टाकावी आणि मगच आरशात स्वतःला पहावे.

त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे खरकटी भांडी. जेवण झाल्यावर भांडी खरकटी तशीच ठेवू नये असे म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असे. मात्र अलीकडे व्यस्त जीवनशैलीमुळे सगळेजण ठराविक कामे वेळेच्या वेळी करू शकतीलच असे नाही.

यावर पर्याय म्हणून भांड्यामध्ये पाणी घालून ठेवावं आणि सकाळी ति निदर्शनास पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब जाऊ शकतो. तोंड धुवून ताजतवाने होत नाही तोपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाहीत याची काळजी नक्की घ्या.

त्यानंतरची वस्तू म्हणजे बंद घड्याळ. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही बंद घड्याळ लावू नये. जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ पाहिले तर तुमचा दिवस त्याच्यामुळे उशिरा सुरू होऊ शकतो. त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिडचिड सुद्धा होऊ शकते.

म्हणून घरात बंद घड्याळ असेल तर ते आधी दुरुस्त करावं किंवा त्या जागी नवीन घड्याळ लावावे. मात्र जुन घड्याळ वापरू नये.त्यानंतरची गोष्ट म्हणजे आक्रमक चित्र. आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येक छबी डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा व त्याच्याशी संबंधित विचार दिवसभर मनात घोळवत ठेवते.

म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्राकृती असणे अत्यंत महत्त्वाच आहे. म्हणून अनेक जण देवाचे चित्र, लहान बाळाचे चित्र, निसर्ग चित्र, फुलांचे चित्र आपल्या बेडरूम मध्ये लावतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही ते योग्य मानले जाते. तर सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात या गोष्टींनी पाहून होणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घ्यावी तर तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *