दिसताक्षणी घरी येऊन या ही फळे, टक्कलवर केस येतील, मुळव्याध, मुतखडा, दातांची कीड अशा अनेक आजारावर रामबाण उपाय

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो फोटोमध्ये दिसणारी वनस्पती तुम्ही कदाचित बघितली सुद्धा असेल. या वनस्पतीचे नाव आहे भुईरिंगणी किंवा चिचुर्डी या नावाने देखील ओळखले जाते. अगदी कमी पाण्याच्या ठिकाणी जमिनीलगत पसरत वाढणारे हे काटेरी झुडूप अनेक प्रकारच्या आजारांसाठीचे औषध आहे.

आयुर्वेदातील सुप्रसिद्ध दशमुळांपैकी एक मूळ असते. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये या झुडपाला फुले येतात. आपल्याकडे जांभळ्या रंगाची फूले येणारे भुईरिंगणी मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच पांढऱ्या रंगाचे भुईरिंगणी देखील कुठे कुठे तरी दिसून येतात.

या भुईरिंगणीला वांग्यासारखे पण अगदी लहान आकाराची फळे येतात. जी पिकण्यापूर्वी पांढरट हिरवी आणि पिकल्यानंतर पिवळी होतात सध्या ही पिवळी फळे आपल्याला हमखास बघायला मिळतील.

ही पिकलेली फळे घरी आणून ती वळून ती थोडीशी बारीक करायची आणि एखाद्या चिलीमध्ये किंवा बिडीमध्ये त्या बिया भरून त्यांचा धूर आपापल्या सहन शक्तीनुसार तोंडात कोंडल्याने दाताला लागलेली कितीही जुनाट कीड नाहीशी होते.

मित्रांनो या भुईरिंगणीचे पंचंग म्हणजे मूळ, खोड, पान, फुले आणि फळे औषध कार्यामध्ये वापरले जातात. यांच्या पंचांगाचा काढा कपतसारी म्हणून कार्य करतो. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खोकला असेल तर या भुईरिंगणीच्या पंचांगाचा काढा बनवून वीस ते तीस मिली या प्रमाणात सकाळ-संध्याकाळ पिल्याने कितीही जुनाट खोकला बरा होतो.

दम्याच्या रूग्णांना भुईरिंगणी फार उपयुक्त आयुर्वेदिक औषधी आहे. कारण या फळांचा वीस ते तीस मिली काढा आणि भाजलेली तुरटी म्हणजेच तुरटीची लाही एक ते दोन चिमटी या प्रमाणात एकत्र करून सकाळ संध्याकाळ पिल्याने दमा बरा होतो.

याशिवाय भुईरिंगणीच्या वाळवलेल्या पंचांगाची पावडर मधामध्ये मिसळून पिल्याने देखील छातीतील कफ बरा होतो. या वनस्पतीचा वापर टीबीसाठी देखील केला जातो. नागरमोथा, पिंपरी, मनुके, भुईरिंगणीची वाळलेली फुले हे सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये आवडीनुसार खडीसाखर मिसळून ठेवा आणि यामधील 5 ते 10 ग्रॅम चूर्ण एक चमचा मध आणि दोन चमचे तुपासोबत मिसळून खाल्ल्याने टीबी बरा होऊ लागतो.

मित्रांनो हे यलॉपिशिया म्हणजे टक्कल पडलेल्या किंवा टक्कल पडायला सुरुवात झालेल्या व्यक्तींसाठी भुईरिंगणी आणि विशेष करून पांढऱ्या रंगाची फुले येणाऱ्या भुईरिंगणी फार उपयुक्त असते. ही फळे ठेचून त्यामध्ये शुद्ध मध मिसळून काही दिवस टक्कल पडलेल्या भागावर लावल्याने नवीन केस उगवण्यास सुरुवात होते.

हा प्रयोग तुम्ही अनेक वैद्याकडून ऐकले देखील असेल. हृदयासंबंधी अनेक आजार या भुईरिंगणीचा वापर करून दूर करता येतात. यासाठी भुईरिंगणीच्या मुळीची 1 ग्रॅम पावडर मधासोबत सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने हृदयासंबंधीचे विकार दूर होतात.

अतिसार जुलाब होत असतील तर या फळांची अर्धा ते एक ग्रॅम पावडर ताकासोबत प्यायला देतात. पोटातील गॅस, अपचन, पोटदुखी, पोटातील जंत यासाठी एक ते दोन ग्रॅम या प्रमाणात भुईरिंगणीच्या मुळांचा वापर करावा.

याची मुळे सारक असल्यामुळे बद्धकोष्ट आणि मुळव्याधीसाठी देखील फायदेशीर ठरतात. मुतखडा पाडण्यासाठी याची मुळे आणि अनंतमूळ सम प्रमाणात वापरले जातात. अशा या काटेरी भुईरिंगणीचा वापर करा आणि निरोगी रहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *