मित्रांनो दसऱ्याचा सण आपण अगदी उत्साहात साजरा केला आता सगळीकडे दिवाळी सणाचे वातावरण आहे सगळीकडे बाजारपेठा सजलेल्या आहेत घरामध्ये गोडधोड पदार्थ तयार करण्यासाठी लगबग चालू आहे. हिंदू धर्मात दिवाळीला आणि धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. दिवाळी हा सण हिंदू धर्मातील खूप मोठा सण मानला जातो. अगदी आनंदाने आणि उत्सहाने हा सण प्रत्येक जण साजरा करीत असतो.
मित्रांनो बरेच जण हे सोने चांदी खरेदी करीत असतात. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकजण नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करतात. तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की, धनत्रयोदशी कधी आहे. खरेदीसाठी आपल्याला शुभ मुहूर्त कोणता आहे? तसेच धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्त काय आहे तो.
तर मित्रांनो शास्त्रानुसार आणि हिंदू कॅलेंडरनुसार धनत्रयोदशीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला येतो. यावर्षी धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.02 वाजता सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे.
तर मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक वस्तू खरेदी करतात. तर या खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया.
तर धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. पण आपण शुभ मुहूर्तावर जर खरेदी केली तर ती आपल्याला खूपच फलदायी व शुभदायी ठरते. जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करत असाल तर 23 ऑक्टोबरला सूर्योदयापासून संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. यावेळेत तुम्ही खरेदी करू शकता.
तर मित्रांनो आपण धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा अगदी मनोभावे व श्रद्धेने केली जाते. तर मित्रांनो या पूजेचा मुहूर्त कोणता आहे याविषयी आता आपण जाणून घेऊया.
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. ही पूजा संध्याकाळी केली जाते आणि यावेळी मंदिरात सर्व देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित करून त्यांना अभिषेक केला जातो. त्यानंतर तुपाचा दिवा लावून फुले व फळे अर्पण करावीत. यानंतर कुबेर आणि देवी लक्ष्मीला पांढरी मिठाई अर्पण करावी. धन्वंतरीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
मित्रांनो ही पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे. जेणेकरून लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घराला प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये कायमच मग प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल. तसेच कोणत्याही प्रकारचे काम असेल तर त्या कामात आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही.
आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करेल व त्यांचा वास आपल्या घरामध्ये कायम राहील. तर मित्रांनो धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या शुभ मुहूर्तावर कोणत्याही वस्तूंची खरेदी करू शकता. तसेच तुम्ही पूजा विधी देखील शुभमुहूर्तावर अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.