धनाची दिशा कोणती? कोषवृद्धीसाठी ‘या’ 5 गोष्टी उपयुक्त व्हाल मालामाल

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

पैसा हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. सगळ्या गोष्टीचे सोंग आणता येतात पण पैशाचं नाही, अशी उक्ती प्रसिद्ध आहे. पैसा मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी माणूस पडेल ते काम करत असतो. आताच्या घडीला पैसा हेच सर्वस्व झाल्यासारखे भासते.

ज्याला पाहावं, तो पैशांच्या मागे धावताना दिसतो. कारण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. दररोजच्या गरजांपासून ते छान, शौकीपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय भागत नाही. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या राहत्या घरात, आपल्या कार्यालयात, कारखान्यात अशा जागांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात, याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.

आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्या गोष्टी आचरल्या, पाळल्या, योग्य पद्धतीने अनुसरल्या, तर घरात सुख, समृद्धी वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.

जीवनातील अविभाज्य बाब असलेले धन म्हणजेच पैसे योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवल्यास कोषवृद्धी, धनवृद्धी होऊ शकते. मात्र, त्यांची दिशा चुकल्यास नुकसान, समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्र वा वास्तु विज्ञानाप्रमाणे धनाची योग्य दिशा कोणती? त्याचे नेमके काय फायदे मिळू शकतील?चला मग जाणून घेऊया.

1) तिजोरीची दिशा – बहुतांश कुटुंबात तिजोरी असतेच. घरात पैसे ठेवण्याची एक जागा निश्चित करण्यात आलेली असते. तिजोरी, कपाट वा अन्य उपलब्ध साधनांनुसार पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, दागिने आणि अन्य बाबी जपून ठेवण्यात आलेल्या असतात. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे.

आपली धन, पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे, असे सांगितले जाते. उत्तर दिशेला कपाट वा तिजोरी उघडली जावी. यामुळे धन, दागिने, कोषवृद्धीचे योग प्रबळतेने जुळून येतात. नोकरी तसेच व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

2) सांडपाण्याची दिशा – घर बांधताना सांडपाण्याचा निचरा कोणत्या दिशेला होतोय, याबाबत दक्षता बाळण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात भाष्य करण्यात आले आहे. घरातील सांडपाणी किंवा दुषित पाणी बाहेर पडण्याची दिशा ही उत्तर असावी, असे वास्तुशास्त्र सांगते.

पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे. यामुळे घरात सुख, आनंद नांदून मान, सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होते, असे सांगितले जाते. एवढेच नव्हे, तर प्रलंबित वा जुनी येणी वसूल होण्यातील समस्या दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

3) देवघराची दिशा – आपल्याकडे बहुतांश घरात देवघर असते. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे आराध्याचे पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. वास्तुशास्त्रात देवघराची जागा किंवा एखाद्या देवतेला कोणत्या दिशेला स्थापन करावे, याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आल्याचे दिसून येते.

महादेव शिवशंकराचे पूजन करावयाचे असल्यास शिवाची मूर्ती वा शिवलिंग किंवा तसबीर अशा पद्धतीने ठेवावी, जेणेकरून पूजा करताना आपले मुख हे उत्तर दिशेला असेल. उत्तर दिशेला तोंड करून केलेल्या पूजन लाभदायक मानले गेले आहे.

असे केल्याने शांतता, समाधान, सुख, आनंदाची प्राप्ती होते. तसेच पूजेच्या श्रेष्ठ फलाची आणि पुण्याची प्राप्ती होते. एवढेच नव्हे, तर धन, धान्य, प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

4) व्यापार, नोकरीतील समस्यांचे निराकरण – वास्तुदोषापासून मुक्तता आणि धनमार्ग प्रशस्त होण्यासाठी घरातील खोली किंवा हॉलमध्ये हिरवा रंगाचा समावेश आवर्जुन करावा, असे सांगितले जाते.

तसेच शक्य असल्यास घरात पोपटाचे चित्र वा तसबीर लावावी. असे केल्याने व्यापार, नोकरीतील अडचण दूर होण्यास मदत होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह संचारतो. कौटुंबिक स्नेहभाव वाढीस लागतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

तसेच घरात एखादे मनी प्लांट असल्यास त्याची जागा ही उत्तर-पूर्व असावी. ही दिशा मनी प्लांटसाठी शुभ मानली गेली आहे. असे केल्याने धनाची कमतरता जाणवत नाही. समृद्धी, वैभव स्थिरावते, असे म्हटले जाते.

5) नाही तर नुकसान होणार – वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला कधीही कचरा, घाण जमा होऊ देऊ नये. घराची उत्तर दिशा ही धन आणि करिअरची असल्याचे शास्त्रात मानले गेले आहे. असे केल्यास आर्थिक आघाडीवरील समस्या वाढू शकतात.

धनासंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रातील नमूद केलेल्या गोष्टींना अनुसरून कार्य केल्यास धन, धान्य, सुख, समृद्धी, आनंद, वैभव प्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जाते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *