मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. आपण अनेक देवीदेवतांच्या पूजा देखील करीत असतो. म्हणजेच विधिवत पूजा करीत असतो. तर सनसमारंभ साजरा करत असताना काही प्रतिकांचे महत्त्व देखील आजही आपण जपत आहोत.
त्यापैकी मंगल कलश हे देखील कोणत्याही शुभप्रसंगी, विवाह, पूजा प्रसंगी स्थापन करतात. मंगल कलश संस्कृतीचे, सुख-समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. तर काही ठिकाणी घराघरांमध्ये नित्यनेमाने पूजला जातो. सृष्टी ज्यांच्या बळावर चालते, ते ब्रह्म, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सारे ब्रह्मांड या कलशात असते.
तर हा मंगल कलश स्थापन करण्यामागे शास्त्र नेमके काय सांगते हेच आज आपण जाणून घेऊयात. तांबे हा धातू उत्तम विद्युतसुवाहक धातू आहे. तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. त्या कलशावर असलेल्या नारळाची एक बाजू कलशातील पाण्यात असते आणि शेंडी कडील भाग ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारतो.
त्या उर्जेपासून एक मंडल तयार होते आणि ही सकारात्मक उर्जा मूलभूत तत्त्वाला जागृत करते. यामुळे ब्रम्हांडातील जी ऊर्जा आहे ही कलशाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. पौराणिक कथेनुसार कलश पात्राची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया.समुद्र मंथनाची कथा प्रसिद्ध आहे.
देव आणि दानवांनी समुद्रमंथनातून अमृत प्राप्ती केली पण मिळवलेले अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न होता. तेव्हा सर्व देवांनी विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी दिली. विश्वकर्मांनी सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं. त्यालाच कलश म्हणतात.
मग तो कलश माती, सोने, चांदी,तांबे यापैकी कशाचाही असो त्याचे महत्त्व तेवढेच असते. कारण देवांनी अमृत भरण्यासाठी तयार केलेले पात्र अशी त्याची महती आहे. जलाने भरलेला कलश हा वरुण देव आणि पवित्र गंगाचे रूप समजून त्याची पूजा केली जाते. कलशावर आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतात. ही पाने देखील धार्मिक दृष्टीने खूपच महत्त्वाची मानली जातात.
ही हिरवी पान निसर्गाचे, चैतन्याचे, सुबत्तेचे प्रतिक आहेत. कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वताचे प्रतिक आहे. तसेच नारळात पंचतत्व असतात. पृथ्वी, आप, तेज , वायू आणि आकाश ही पाचही तत्व नारळात आहेत म्हणून त्याला श्रीफळ म्हटले जाते. तर कलशाची स्थापना कशी करावी हे आपण जाणून घेऊ.
प्रत्येकाच्या घरातील मंगल कार्यामध्ये गणरायाबरोबर कलश पूजा ही केली जाते. कलशावर नारळ ठेवून शेंडीचा भाग हा वर करावा. नारळाला पाणी लागेल इतके पाणी कलशात घालायचे आहे. कलशामध्ये एक नाणी टाकावे. नारळाच्या कडेने आंब्याची, किंवा विड्याची पाने लावावीत. नारळावर हळद कुंकू वहावे.
कलशावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ किंवा गहू पसरून त्यावर हळदीकुंकू वहायचे आहे आणि मगच कलश स्थापित करायचा आहे. दर पौर्णिमा, अमावस्येला या कलशातील पाणी बदलायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, वैभव नांदण्यास सुरुवात होते. तर असा हा पवित्र मानला गेलेला कलश तुम्ही देखील आपल्या घरामध्ये नक्कीच स्थापित करायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.