देवघरात असतील या वस्तू तर घरात कसलीच कमी राहत नाही!

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच. आपल्याला जर प्रसन्न रहायचे असेल तर आपल्या देवघरांमध्ये जर आपण शांत मनाने एकाग्र मनाने बसलो तर आपले मन शांत आणि प्रसन्न होत असते. तसेच अनेक प्रकारचे ताणतणावापासून जर आपणाला सुटका हवी असेल तर आपले देवघर हे कायमच स्वच्छ सुंदर तसेच देवघरांमध्ये नित्यनेमाची पूजा करणे आवश्यक असते.

तर आज मी तुम्हाला स्वामिनी सांगितलेल्या अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू जर आपल्या देवघरांमध्ये असतील तर आपणाला कशाचीच कमतरता राहत नाही.आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सतत अडीअडचणी येत राहतात किंवा पैसा अपुरा पडतो भांडण तंटे होतात असे अनेक कारणे संकटे आपल्या जीवनात येत असतात.

तसेच आपण कितीही कष्ट केले तरी पैसा हा आपल्याला अपुरा पडत असतो. तर स्वामिनी सांगितलेल्या या वस्तू आहेत या वस्तू जर तुम्ही देवघरांमध्ये ठेवल्या तर तुम्हाला यापैकी कोणतीच अडचण भासणार नाही.तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच मिळेल. तर यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे चंदन. चंदन हे शांततेचे आणि शितलतेचे प्रतीक मानले गेलेले आहे.

चंदन जर आपल्या देवघरांमध्ये ठेवले तर आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहते. तसेच आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहण्याचे काम हे चंदन करत असते. त्यामुळे चंदनाचे एखादे खोड तरी आपणाला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे.तसेच जर आपण आपल्या देवघरांमध्ये शंख ठेवला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असे मानले गेलेले आहे.

शंखाच्या मध्यभागी तसेच वरून मागील बाजूस ब्रम्हा तसेच पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती यांचा वास असतो. जे पुण्य आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन प्राप्त होते तेच पुण्य आपणाला शंखाचे दर्शन घेतल्याने होत असते. त्यामुळे आपण आपल्या देवघरांमध्ये एखादा तरी शंख ठेवणे गरजेचे आहे.

तसेच मित्रांनो आपण आपल्या देवघरांमध्ये शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवून पूजा करत नाही. त्याच्या ऐवजी आपण महादेवाची पिंड किंवा शिवलिंग ठेवून त्याची पूजा केल्याने महादेवांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होतो. तसेच शिवलिंग आपल्या देवघरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते.

जे काही भांडण तंटे वादविवाद असतील यापासून सुटका या शिवलिंगामुळे होते. त्यामुळे आपल्या देवघरांमध्ये शिवलिंग असणे खूपच गरजेचे आहे.यामुळे आपल्या प्रगतीत ज्या काही अडचणी येत असतील त्या सर्व दूर होतात. तसेच आपल्या देवघरांमध्ये कवडी देखील असणे गरजेचे आहे. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे.

त्यामुळे पिवळ्या कवड्या तुम्ही लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तसेच आपल्या घरामध्ये जी काही पैशासंबंधी टंचाई असेल ती सर्व निघून जाईल आणि आपणाला कशाचीच कमतरता जाणवणार नाही.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या चार वस्तू तुम्ही अवश्य आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहेत. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाचीच कमतरता राहणार नाही. सदैव लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *