देवघराची स्वच्छता करताना कोणती काळजी घ्यावी?

अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाचा घरामधील मुख्य जागा म्हणजे देवघर असतं .देवघरामध्ये आपल्याला किती जरी टेन्शन किंवा अडचणी असल्या तरी आपण थोडा वेळ जरी देवघरांमध्ये बसलो तर आपले सर्व टेन्शन अडचणी दूर होतात. देवघर ही अशी जागा आहे की जिथे आपल्याला समाधान शांतता मिळत असते.

आपण देवघराचे नियमितपणे देवांची पूजा केली पाहिजे तेथील जागा दररोज आपण स्वच्छ देखील ठेवली पाहिजे. देवघरासाठी जे साहित्य लागत ते साहित्यच फक्त आपल्याला देवघरांमध्ये ठेवायच आहे. बाकीचं आपल्याला न लागणार सामान तिथे ठेवू नये.तर मित्रांनो देवघराची स्वच्छता कशी करावी हे आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्या देवघराचे स्वच्छता रोजची रोज होण आवश्यक आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवाचा वास असतो हे लक्षात असायला हवं देवघराकडे पाहिल्यावर आपल्याला प्रसन्न वाटायला हवं.आपले पाच ज्ञानेंद्रय दृष्टी स्पर्श ऐकणे चव घेणं आणि गंध याना देवघरामध्ये चालना मिळते.

आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जातो आपण दिवा लावतो किंवा कापूर जळतो याचा आपल्या दृष्टीशी संबंध येतो .
आरती वर किंवा कापरावर आपण हात फिरवून जेव्हा डोळ्याला लावतो तेव्हा याचा स्पर्शाशी संबंध येतो. आपण जेव्हा देवांना फुल वाहतो तेव्हा सहजच आपल्या त्याचा वास येतो तर त्याचा संबंध हा गंधाशी आहे.

तुळशीपत्र घातलेले जेव्हा आपण अमृत पीत असतो तेव्हा हा चवीशी संबंध येत असतो हेच तीर्थ तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही.साधारणपणे तांब्याची भांडी वापरतात तांब्याच्या भांड्यामुळे कोणताही प्रकारची हानी होत आरती करणे त्याचबरोबर घंटा नाद करने या सर्वांचा ऐकण्याची संबंध येतो.

आणि म्हणूनच आपल्याला जेवढी आवश्यक तेवढी ऊर्जा आपण देवघरातून मिळते. ऐकणे चव घेणे स्पर्श गंध हे सर्व आपल्याला देवघरातून मिळत असतो. म्हणूनच देवघराच्या स्वच्छतेला जास्त महत्व दिले आहे. मी स्वच्छता ठेवताना देवघरांमध्ये ही एक वस्तू असणे आवश्यकच आहे.

ती वस्तू म्हणजे देवघरांमध्ये देवघर झाडण्यासाठी एक वेगळा झाडू आपल्याला आणायचा आहे व तो फक्त आपल्याला देवघर झाडण्यासाठीच वापरायचा आहे साफसफाई झाल्यानंतर आपल्याला गंगाजल शिंपडायचे आहे. दिवा देखील आपल्याला ज्योत साफ करूनच लावायचा आहे. आणि त्याचबरोबर देवघराची साफसफाई कोणत्या दिवशी करू नये.

असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे देवघराची साफसफाई प्रत्यक्ष शनिवारी नक्की करा.देवघराची साफसफाई गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका. देवाच्या मूर्ती आणि फोटोची काळजी घ्यायची आहे ती कशी घ्यायची आहे तुम्ही देवघराची पूजा करत असता तेव्हा देवांचे फोटो किंवा मूर्ती तसेच जमिनीवर ठेवायच्या नाहीत स्वच्छ ठिकाणी ठेवायचे आहे.

देवांच्या चांगल्या कपड्यावर किंवा स्वच्छ भांड्यांमध्ये आपल्याला त्या मूर्ती आणि फोटो ठेवायचे आहेत गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सोडा टाकून ते स्वच्छ करून घ्यायचे आहे असे केल्याने त्या भांड्याला जास्त चमक येणार आहे.दररोज आपण पूजा करताना हर हर महादेव म्हणून दररोज कापूर जाळायचा आहे.

असे केल्याने जर घरामध्ये वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर होणार आहेत कापराच्या वासामुळे घरातले वातावरण सकारात्मक होते आणि त्याचबरोबर सुख-समृद्धी देखील टिकून राहते तर तुम्ही सुद्धा तुमच्या देवघराची काळजी अशा प्रकारे घेतला तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत व तुमचे आयुष्य देखील बदलून जाईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *