देवघर, संपूर्ण माहिती, दिशा व स्थान, काय ठेवावे काय ठेवू नये.

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

घराची पूर्व आणि उत्तर दिशामधील जागा म्हणजे ईशान्य दिशा. या जागेमध्ये घरातील वास्तू पुरुषाचे डोके असते. ही जागा आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते. या ठिकाणी ईश्वरीय तत्त्व कार्य करीत असते. पूजा पाठ करण्यासाठी मंत्र आणि साधना करण्यासाठी ही अगदी योग्य दिशा आहे.

काही कारणाने किंवा चुकून आपल्याला माहिती नसल्यामुळे यामुळे काहींच्या घरात जड वस्तू किंवा केरकचरा अथवा भंगार सामान या ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीचे डोके सारखे दुखते किंवा जडजड वाटते. तर काहींना डोक्यावरती नेहमी टेन्शन असते. काहींना कारणाने नेहमी दबावामध्ये व्यक्ती जीवन जगत असतो.

जर आपल्या घरात ईशान्य दिशेला देवघर बनवणे शक्य नसेल तर देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला आपण बनवू शकतो. पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला चालू शकते पण दक्षिणेला तोंड करुन घरातील फोटो किंवा मुर्त्या ठेवू नये हे शास्त्र संमत नाही.

घरातील मंदिराला कळस असू नये नाही तर ते मंदिर होते. देवघर हे देवघरच असावे ते मंदिर असू नये. एका देवी देवांचे एकच फोटो किंवा मूर्ती देवघरात असावी. दोन किंवा अधिक ठेवू नये. त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. असतील तर त्या फोटो किंवा मूर्तीची क्षमा मागून त्यांचे विसर्जन करावे.

देवांच्या किंवा देवींच्या फोटोचे फ्रेम चांगली असावी. सडलेले कुजलेले नसावी. फाटलेली नसावी किंवा तडकलेली नसावी. असेल तर लगेचच बदलावे. तसेच काही फोटो फाटलेली असतात त्यांना विसर्जन करावे आणि नवीन आणावेत. हात पाय तुटलेली मूर्ती कधीचे पूजन करून नये.

त्याची माफी मागून विसर्जन करावे. तसेच डोळे, चेहरा अस्पष्ट असेल तर अशीही मूर्ती बदलून घ्यावी. आपल्या पुंज पितरांचे फोटो देवघरात ठेऊ नये. आपले पूर्वज आपल्यासाठी कितीही महत्वाचे असले तरीही देवाची जागा घेऊ शकत नाही.

तसेच धार्मिक गुरूंचे फोटोपण देवघरात लावू नये. नैऋत्य दिशा ही पितर गुरूंचे आहे. याठिकाणी लावल्यास आपल्या कार्यात यश मिळते. साग, चंदन, सिसम या लाकडापासून देवघर बनवलेले अगदी योग्य आहे. तसेच पांढऱ्या मार्बलचाही देवारा चालतो. मंदिरावर म्हणजे देवाची डोके येतात जर आपण मंदिराच्या वरती अगरबत्ती, तेलाची बाटली, कापूस, कुंकू, घंटी, आरत्यांची पुस्तके, धूप, जप माळ इत्यादी ठेवलेले असेल तर हे चुकीचे आहे.

हे देवांच्या डोक्यावर भार असते म्हणून असे मंदिरावर कधीच ठेऊ नये. सकाळ संध्याकाळ पूजा करावी. देवाला धूप अगरबत्ती आरती करावी. घंटी आणि शंख वाजवावा आणि आपल्या श्रद्धेप्रमाणे पूजा करावी. धूप-दीप शंख ध्वनीमुळे घरामध्ये पॉ झि टि व्ह ऊर्जा निर्माण होते आणि आपला मूड अगदी आनंदी राहतो. जशी आपली श्रद्धा असेल तसे परमेश्वर आपल्याला फळ नक्की देतात.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *