देवघर बदलत असाल तर या गोष्टींची काळजी अवश्य घ्या!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या घरामधील मुख्य जागा म्हणजे आपले देवघर आहे. देवघर असे ठिकाण आहे की आपल्याला किती जरी टेन्शन असलं किती जरी आपल्याला काही जरी होत असेल तर आपण जर देवाची पूजा केली तर आपल्याला खूप मस्त वाटत असतं. व तिथे बसल्यानंतर देखील आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा केली जाते.

आपल्या घरातील मुख्य व्यक्ती किंवा कोणीही देवाची पूजा करत असतात देवाची पूजा केल्यानंतर घरातले वातावरण एकदम आनंदीमय होऊन जातं. तर मित्रांनो देवघर जर तुम्ही सतत बदलत असाल तर या गोष्टी आवर्जून पाळायचे आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो घराबरोबरच देवघरही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते.देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते.घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते. पूजा पाठ या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतो. परंतु देवघर आणि देवारा वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तो पहिला वास्तुशास्त्रानुसार आपण जाणून घ्यायचा आहे . त्याच्यानंतर आपल्याला आपले देवघर बदलायचे आहे.

देवघर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते. त्यामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला तुम्ही देवघर केला तरी चालू शकत. देवघर हे ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ति हि ईशान्य दिशेतून प्रवेश करते व नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते. तर तुमचे देवघर चुकीच्या दिशेने असल्यास तर ते बदलताना तुम्हाला गोष्टी पाळायला हव्यात.

घरामधे देवघर हे अशा ठिकाणी आपल्याला करायचे आहे की दिवसभरातून काही वेळा तरी आपल्या देवघरावर ऊन पडले पाहिजे. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश ताजी हवा येत राहते त्या घरात विविध दोष नष्ट देखील होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्म क ऊर्जा नष्ट होते व सकारात्म ऊर्जा घरामधे येते.

तुमच्या देवघरातील दिवा आणि समाई आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत.त्याचमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते . निरंजन धूप आरती हे आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तर धूप व उदबत्तीचे स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. अतिशय शांतपणे मनात कुठलाही राग द्वेष नसेल अशावेळी देवघर बदलायचे आहे.

अमावस्या सोडून शुभ दिवशी हे कार्य करावे देव घराची जागा बदलण्या अगोदर दोन नारळ घ्यायचे आहेत एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवा आणि दुसरा नारळ नवीन देवघराच्या जागे ठेवा हे नारळ पाटावर किंवा ताटामध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवघराची जागा बदलण्यास घ्यावी पहिल्यांदा जुन्या देवघराच्या जागी दोन ताटे ठेवायची आहेत.

एका ताटामध्ये जे विसर्जित करायचे आहे ते ठेवा आणि दुसऱ्या ताटामध्ये जे देव घराबाहेर न्यायचे आहेत ते ठेवा.देवाचे फोटो आणि मुर्त्या देवघरातून बाहेर काढताना दोन प्रकारच्या प्रार्थनाआपल्याल करायच्या आहेत. ज्या मुर्त्या किंवा फोटो विसर्जित करायचे आहेत. त्या प्रत्येक देवाची प्रार्थना करून त्या देवाचे नाव घेऊन नमस्कार करायचा आहे.

आणि देवासमोर क्षमा प्रार्थना मागायची आहे. त्यानंतर एक चांगला मुहूर्त बघून त्या मुर्त्या फोटो आदरांशी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. नंतर जे फोटो मुर्त्या देवघराबरोबर न्यायचे आहेत.प्रत्येक देवाची प्रार्थना करून त्या देवांचे नाव घेऊन नमस्कार करायचा आहे आणि एक प्रार्थना म्हणायची आहे.

हे देवा आजपर्यंत आम्ही या जागेवर नित्य पूजा करत आलो पण आजपासून आम्ही तुझी वास्तू नुसार योग्य जागी ठेवून पूजा करणार आहोत यासाठी या जागेवरून आम्ही तुम्हाला हलवत आहोत. या जागेवरून तुम्हाला हलवत असताना आमच्या हातून काही चुक झाल्यास किंवा आमच्याकडून कोणते अपराध झाल्यास आम्हाला क्षमा करअसे म्हणायचे आहे.

प्रार्थना झाल्यानंतर आदरणीशी दुसऱ्या ताटामध्ये घेऊन नवीन देवघरा जवळ जायचे आहेत नंतर नवीन देवघरात व्यवस्थित फोटो मुर्त्या मांडून प्रार्थना करावी ही देवाणूक आजपासून आम्ही तुमची या जागेवरून नित्य पूजा करणार आहोत तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा आणि आमची पुजा गोड मानून घ्यावी .आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला प्राप्त व्हावे ही प्रार्थना तुम्हाला करायचे आहे.

नंतर नवीन देवघराजवळ ठेवलेले नारळ फोडून गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरावे जुन्या देवघरा जवळ ठेवलेले नारळ देवांसोबत ती विसर्जन करावे नमस्कार करून क्षमा मागावी व नारळाचं सर्व फोटो विसर्जन करावे मंडळी तुम्ही सुद्धा तुमचे देवघर बदलत असाल ज्या वस्तू किंवा जसे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत तसे तुम्हाला करायचे आहेत याचाच तुम्हाला खूप फायदा होणार आहे व लाभ देखील मिळणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *