देवशास्त्रात देवाच आवाहान करणं, त्याला बसण्यासाठी आसन देण, त्याला चरण धुण्यासाठी पाणी देणे यासारखे क्रमवार सोळा उपचार शिकून त्या माध्यमातून विधीवर भावपूर्ण नित्य देवपूजा केल्यास मनाची शांती लाभते, घरात पवित्र व प्रसन्न वातावरण राहत, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात.
त्यासाठी रोजची देवपूजा कशी केली पाहिजे चला तर जाणून घेऊया. हिंदू धर्मातील सगुण उपासनेचा पाया म्हणजे देवपूजा. घरी येणाऱ्या अतिथीचे स्वागत आपण जसे आदरपूर्वक करतो तसेच देवाचे सुद्धा करावे. म्हणजेच देवाची यथासांग पूजा करावी तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.
त्यासाठी देवशास्त्रात देवाचे सोळा क्रमवार उपचार सांगण्यात येतात. मात्र वेळेच्या अभावामुळे हे अनेकांना शक्य होत नाही आणि घाई घाईने देवाची पूजा आटोपली जाते. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही पाहिजे तसे फळ मिळत नाही, घरात प्रसन्न वातावरण राहत नाही आणि काही ना काही समस्या सतत उद्भवत असतात.
त्यासाठी पूजेचे काही नियम लक्षात ठेवूनच देवाची पूजा केली पाहिजे. त्यासाठी क्रमवार सोळा उपचार पद्धतीने नित्य पूजा केली पाहिजे. आता सोडशोपचार पूजा म्हणजे काय तर पूजेचे सोळा उपचार किंवा त्या कृती. त्यात देवाला आवाहान करणे, देवासाठी आसन, देवाचे पाय धुणे, अर्घ्य अर्पण करणे, आचमन भरणं, स्नान करणं, देवाला वस्त्र घालणं, यज्ञपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प या 16 कृती करणं अनिवार्य मनले जाते.
मात्र सोळा उपचारांनी देवपूजा करणे प्रत्येकाला शक्य नसते. त्यासाठी पाच उपचारांनी देवपूजा केली तरी चालते. काहींना तर ही पंचोपचार पूजा काय असते हे ही माहीत नसते. आणि त्यासाठीच पांचोपचार पूजा करताना कोणत्या कृती कराव्यात हेही जाणून घेऊया. पंचोपचार पूजा म्हणजेच सोळा उपचारांपैकी पाच उपचारांनी केलेली देवपूजा.
त्यात गंध लावणं, फुले वाहने, धूप दाखवणे दीप, ओवाळणे आणि नैवेद्य दाखवणे या कृतींचा समावेश होतो. त्यात देवांना स्नान घालणं हा मुख्य भाग मानला जातो. त्यामुळे देवाला आवाहन करून एक एक करून सर्व मूर्तींना पाण्याने स्नान घालावे. याव्यतिरिक्त शक्य असल्यास पंचामृत स्नान किंवा गंधोदक स्नान घालावं.
देवाचे स्नान झाल्यानंतर पंचोपचार पूजा विधीला सुरुवात करावी. देवाला गंध लावाव, देवाला फुले अर्पण करावेत, धूप किंवा उदबत्ती ओवाळवी, देवाला तुपाचा निरांजन ओवाळाव, देवासमोर पाण्याने चौकोनी मंडळ तयार करून त्यावर नैवेद्य दाखवावा. मात्र या पंचोपचार पद्धतीमध्ये ही काही नियम आहेत.
प्रथम देवाला अनामिकेने गंध लावावा, त्यानंतर हळदीकुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका त्यांच्या चिमटीत घेऊन देवतेच्या चरणावर वहावं. देवाला निरांजन फिरवताना ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा सावकाश ओवाळाव. याच वेळी डाव्या हाताने घंटी सुद्धा वाजवावी.
या व्यतिरिक्त पूजेला बसण्याआधीचे नियम सुद्धा असतात. त्याचेही पालन करणं तितकच आवश्यक मानल जात. पूजेला बसताना स्वच्छ धुतलेले सोवळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावं. पूजा करताना आसनावर बसावं. आपले आसन देवाच्या आसनापेक्षा उंच असू नये. कपाळाला गंध किंवा कुंकवाचा टिळा नक्की लावावा.
मन एकाग्र असाव आणि देवपूजा करताना मध्येच उठू नये. या पद्धतीने तुम्ही जर देवपूजा केली तर तुमच्यावर नक्कीच देवाची विशेष कृपा होईल, मन शांत राहिला आणि घरात कायम प्रसन्नतेचे वातावरण राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.