देवाची आरती करताना या गोष्टी लक्षात ठेवा; पूजा विधी लागेल सत्कारणी!

माहिती अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच आणि देवीदेवतांच्या मुर्त्या तसेच फोटो आपल्या देवघरांमध्ये असतात. घरातील प्रत्येक व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो किंवा आपल्या घरातील मुले ही दररोज आपल्या घरातील देवपूजा करीतच असतात. तसेच देवपूजा झाल्यानंतर आरती करणे तसेच गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवत असतात.

आपल्या घरातील अडचणी दूर व्हाव्यात तसेच कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू नये तसेच घरामधील वातावरण प्रसन्नतेचे राहावे यासाठी प्रार्थना देखील करीत असतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे.

म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही देवघरांमध्ये आरती करीत असाल तर या गोष्टींचे पालन करणे खूपच महत्त्वाचे आहे. तर या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ज्या गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे चला तर जाणून घेऊयात.तर देवाची आरती नेहमी एकाच ठिकाणी उभे राहून करावी. आरती करताना नेहमी थोडे वाकूनच आरती करावी.

देवाच्या चरणाशी चार वेळा, नाभीजवळ दोनदा, चेहऱ्यावर एकदा आणि पूर्ण मूर्तीवरून सात वेळा आरती ओवाळावी. अशा प्रकारे तुम्ही आरती 14 वेळा ओवळल्यानं तुमचा नमस्कार भगवंतामध्ये असलेल्या चौदा भुवनांपर्यंत पोहोचतो, असे मानले जाते. स्कंद पुराणातही आरतीबाबत एक विशेष नियम सांगितला आहे.

या संदर्भात स्कंद पुराणात उल्लेख आहे की, जर एखाद्या व्यक्तीला मंत्रोच्चार-आरतीचे नियम माहीत नसतील किंवा त्याला पूजेची संपूर्ण पद्धत माहीत नसेल. पण देवाची आरती आणि पूजा भक्तीभावाने केली तर त्याची पूजा स्वीकारली जाते. भगवान विष्णूंनी शास्त्रात सांगितले आहे की, जो व्यक्ती तुपाच्या दिव्याने आरती करतो त्याला कोटि कल्पे स्वर्गात स्थान प्राप्त होते.

कापराने आरती केल्याने माणसाला अनंतात प्रवेश मिळतो. पूजेत केलेली आरती जो पाहतो त्याला सर्वोच्च पद प्राप्त होते. त्यामुळे पूजेनंतर आरती करताना धार्मिक बाबींची विशेष काळजी घ्यावी.आरतीचे 7 प्रकार आहेत. मंगला आरती, पूजा आरती, श्रृंगार आरती, भोग आरती, धूप आरती, संध्या आरती, शयन आरती.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील आरती करताना या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे. म्हणजेच आपली जी काही पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचेल. तसेच त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपणाला प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *