दर मंगळवारी घराच्या दारावर ही एक वस्तू टाकलेले पाणी शिंपडले तर कधीच कोणाची नजर लागणार नाही. यामुळे घरात कोणती बाधा, अडचण, नजर दोष, समस्या, दुःख येणार नाही. मित्रांनो ही एक वस्तू पाण्यामध्ये टाकायची आणि दररोज नाही फक्त मंगळवारी तुम्हाला हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दारावर शिंपडायचे आहे.
आता ही कोणती वस्तू आहे आणि मंगळवारी केव्हा? तर मंगळवारी हे पाणी तुम्ही सकाळी किंवा दुपारी शिंपडू शकता. संध्याकाळी हे पाणी शिंपडायचं नाही. फक्त सकाळी आणि दुपारी या वेळेत तुम्ही कधीही शिंपडू शकता. असं ठरवा की संध्याकाळच्या पाच वाजायच्य आत तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे.
आता हे पाणी कसं शिंपडायचे तर घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन आपण घराचा आत मध्ये बघत आहोत अशा रीतीने आपल्याला दाराच्या बाहेर जाऊन उभे राहायचे आहे आणि वाटीतून आपल्या उजव्या हातावर ते पाणी घ्यायचं. आणि संपूर्ण दारावर, उंबरठ्यावर, वरती आपली दाराची चौकट असते त्यावर सगळी कडे पाणी शिंपडायचे.
नंतर पायऱ्या असतील तर पायऱ्यांवर, थोडस आजूबाजूला पाणी शिंपडायचं.आता हे पाणी तयार कसं करायचं तर एका वाटीमध्ये मंगळवारच्या दिवशी शुद्ध पाणी घ्या. तुम्ही जे पाणी पिता ते पाणी तुम्ही एक वाटी मध्ये घ्या आणि त्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे.आता ही वस्तू कोणती आहे तर ही वस्तू आपल्या घरात असलेला कापूर आहे.
कापुराची वडी नसेल तर घेऊन या मार्केटमध्ये पूजा सामग्रीच्या दुकानातून कापूर घेऊन या आणि एक दोन कापुराची वडी तुम्हाला पाण्यात टाकायची आहे. पाच दहा मिनिटं ती वडी पाण्यातच राहू द्यायची. मग ते पाणी आपल्या घराच्या बाहेर, मुख्य दरवाजा वर, उंबरठ्यावर चौकटी वर शिंपडायचं.
जे राहिलेलं पाणी असेल किंवा त्यामध्ये पडलेला कापूर असेल ते तुम्ही एका साईडला कुठे तरी टाकू शकता.दर मंगळवारी कापूर मिश्रित पाणी नक्की दारावर शिंपडा. याने घरात आलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजर दोष बाधा सर्वकाही याने नष्ट होते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका