दसऱ्याला कोणत्या गोष्टी केल्याने घरामध्ये समृद्धी येईल? खूपच उपयुक्त अशी माहिती

अध्यात्मिक वायरल

मित्रांनो, सगळीकडेच आता नवरात्रीचे वातावरण आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रीत अनेक महिला नवरात्रीचे व्रत करतात. अगदी मनोभावे व श्रद्धेने या महिला व्रत करीत असतात. मातेची नऊ रूपे आणि या नऊ रूपांची आपण नवरात्रीमध्ये पूजा देखील करतो. मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण अनेक उपाय देखील करीत असतो. तर मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी, आपले घर कायमच भरभराटीचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी आपण छोटे मोठे उपाय देखील करीत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जर केला तर घरामध्ये तुमच्या सुख समृद्धी नांदेल.

अश्विन शुक्ल दशमीला दसरा साजरा केला जातो. अनेक लोक या दसऱ्या दिवशी छोटे छोटे उपाय करीत असतात. तर मित्रांनो हे उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल. तसेच तुमच्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या देखील दूर होतील. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात माता लक्ष्मीची पूजा करताना झाडू दान केल्यास धन समृद्धीची कधीही तुम्हाला कमी पडणार नाही. तसेच मित्रांनो तुमच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी आई जगदंबेची पूजा करून दहा फळांचा नैवेद्य दाखवा आणि ही दहा फळे तुम्ही गरिबांना वाटायची आहेत.

तर मित्रांनो, जगदंबेची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा दहा फळांचा नैवेद्य दाखवीत असता त्यावेळेस तुम्ही जय विजयाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. तसेच मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही शमीच्या झाडाखाली जर दिवा लावला तर तुमचे जे काही खटले चालू आहेत त्या खटल्या पासून तुमची सुटका होऊ शकते. तसेच सौभाग्य देखील प्राप्त होते.

जर मित्रांनो तुम्हाला व्यवसायमध्ये खूप तोटा होत असेल, नुकसान होत असेल तर तुम्हाला एक नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तसेच मिठाई देखील घेऊन हे सर्व तुम्ही राम मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे. तसेच मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या रोगामुळे त्रस्त असाल तर तुम्हाला पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे आणि स्वतःवरून 21 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो नारळ रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्यायचा आहे. असे केल्याने तुम्हाला रोगांपासून मुक्तता नक्की मिळेल.

दसऱ्याच्या दिवसापासून मित्रांनो सलग तुम्ही 43 दिवस जर कुत्र्याला बेसनाचा एक एक लाडू खाऊ घातलात तर तुमच्या ज्या काही पैशाच्या बाबतीत समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होणार आहेत. अनेक संकटांपासून मुक्ती प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर यासाठी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सुंदर कांडाची कहाणी ऐकावी किंवा वाचावी.

तसेच मित्रांनो तुम्ही दसऱ्याच्या दिवशी तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि हा तुकडा तुम्ही घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून तो गच्चीवर किंवा निर्जन ठिकाणी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून फेकायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील म्हणजेच आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींची जी काही नकारात्मक शक्ती असते ती नकारात्मक शक्ती ही बाहेर जाते आणि आपल्या कुटुंबामध्ये सकारात्मकता निर्माण होते.

मित्रांनो हा एक महत्त्वाचा उपाय आहे जो तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सरस्वती मातेचे पूजन नक्की करायला हवे. जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेचे जर पूजन केले तर सरस्वती मातेचा आपल्या मुलांवरती कृपा आशीर्वाद राहतो. हे सरस्वती पूजन जर तुमच्या घरातील मुलांनी केले तर खूपच चांगले आहे. तर मित्रांनो घरामध्ये तुम्ही वह्या पुस्तके आहे ते मांडायचे आहेत आणि त्यावरती हळदी, कुंकू वहायचे आहे. अक्षता, फुले वहायचे आहेत.

आपल्या मुलांना सरस्वती काढायला शिकवा. सरस्वती मातेचा एखादा श्लोक तुम्ही त्यांना शिकवा. त्यामुळे सरस्वती मातेची कृपा आपल्या मुलांवर नक्की राहील. तर मित्रांनो या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सरस्वतीचे पूजन नक्की करा. तर मित्रांनो वरीलपैकी उपाय हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *