चुकूनही हे सामान पंलगाखाली ठेवू नका.

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो तुम्ही तुमच्या पलंगाखाली किंवा दिवाणमध्ये सामान ठेवता का? ठेवत असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा. कारण वास्तू शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की, काही वस्तू अशा आहेत ज्या आपण पंलगाखाली किंवा दिवाणमध्ये चुकूनही ठेवू नये.

त्याचे भयंकर परिणाम अनुभवायला येतात. पण कोणत्या आहेत त्या वस्तू आणि काय आहेत परिणाम चला जाणून घेऊया. मित्रांनो वास्तु शास्त्रानुसार माणूस ज्या पलंगावर झोपतो त्याच्या आरोग्यावर आणि मनावर सुद्धा विशेष परिणाम होत असल्यामुळे त्यासंबंधीच्या वास्तू नियमांचे पालन करणे अवश्य आहे.

वास्तुशास्त्रज्ञ सांगतात की काही गोष्टी पलंगाखाली चुकूनही ठेवू नयेत. कारण त्यातून निर्माण होणारा वास्तुदोष हा सुखशांती हिरावून घेतो आणि आर्थिक संकटाला आमंत्रण देतो. चला तर मग बघुया कोणत्या आहेत त्या वस्तू. जर तुम्ही धनहानीमुळे त्रस्त असाल तर वास्तुशास्त्राचे हे उपाय तुम्ही करून बघायला हवेत.

इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार पलंगाखाली कधीही ठेवू नये. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्याचबरोबर झोप न येण्याची समस्या सुरू होते. फाटक्या कपड्यांची पिशवी सुद्धा आपण सहज पलंगाखाली टाकून देतो किंवा दिवाणमध्ये टाकतो. पण हे सुद्धा चुकीचा आहे.

त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोपेच्या समस्या आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. मग जर मित्रांनो तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर तुमच्या दिवान मध्ये असलेलं सामान किंवा पलंगाखाली असलेले सामान एकदा तपासून पाहा. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत का? काही फाटक्या कपड्यांची पिशवी ठेवली आहे का? हे तपासून बघा.

तसेच गंजलेले लोखंडी आणि प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा वास्तुशास्त्रानुसार पलंगाखाली ठेवू नये. कारण त्यातून निर्माण होणारे वास्तुदोष घरात भयंकर संकटे आणतात. याशिवाय पलंगाखाली प्लास्टिकच्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्याचबरोबर झाडू सुद्धा ठेवणे अशुभ मानले जाते.

त्यामुळे मेंदूवर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. आर्थिक समस्या निर्माण होतात. कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात. तसेच दागिने, काच, पादत्राणे आणि तेल, सोने, चांदी किंवा इतर धातूंचे दागिने सुद्धा बेडखाली कधीही देऊ नये. बेडखाली शूज आणि चप्पल ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

याशिवाय पलंगाखाली कोणत्याही प्रकारच्या काचा, पेन हे सुद्धा ठेवणे टाळावं. कारण ते वास्तुच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. मग मित्रांनो तुम्हीसुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने ग्रस्त असाल आणि तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर सगळ्यात आधी हे काम करा की तुमच्या दिवाना खाली असलेल किंवा पलंगाखाली असलेलं सामान तपासून बघा.

त्यामध्ये अशा प्रकारचं काही समान असेल तर ते लगेच काढून टाका आणि त्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल होतो त्याचा अनुभव घ्या. दिसायला या गोष्टी अगदी छोट्या छोट्या दिसत असल्या आणि यांने आपल्या आयुष्यात मोठा बदल काय होणार आहे असं वाटत असलं तरी सुद्धा या गोष्टी करून बघायला काही हरकत नाही.

काय सांगावं कदाचित बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला झोप लागत नसेल आणि हे केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल त्यामुळे हा अनुभव नक्कीच घेऊन बघा आणि तुमच्या आयुष्यात अगदीच फार मोठा बदल जरी नाही घडला तरी सुद्धा कमीत कमी तुमचं घर नक्की स्वच्छ होईल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *