चामखीळ सहज गळून पडेल कितीही मोठी असू द्या करा हा उपाय

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आपल्या शरीरावर आपल्याला काही वेळा चामखीळ येतात. हे नको असलेले चामखीळ शरीरातील त्वचेची छिद्र प्रसरण पात नसून जवळ येतात. त्या वेळी त्वचेस शुद्ध वायू मिळत नसल्याने चामखीळ बनतात. त्या व्यतिरिक्त पापिलोमा विषाणूंमुळे पण चामखीळ होतात.

कधी कधी हे तीळ आणि चामखीळ आनुवंशिक असतात तर कधी शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्समुळे पण आढळतात. हे तीळ किंवा चामखीळ आपल्या सौंदर्यात बाधक असतात. शरीरांवर जास्त प्रमाणात तीळ किंवा चामखीळ असल्यास त्वचा तज्ज्ञांकडून त्वरित परामर्श घ्यावे.

हे एखाद्या आजाराचे संकेतही असू शकतात. काही वेळा चिकित्सक सर्जरी करण्याचे परामर्श देतात. पण ह्या चामखिळींना आपण काही घरगुती उपाय करून पण नाहीसे करू शकता. आपण आपल्या स्वयंपाकातील दैनंदिन उपयोगात येणाऱ्या साहित्यांचा वापर करून चामखिळीला नाहीसे करता येऊ शकते. चला तर मग बघूया कोणते आहेत ते साहित्य.

1) सफरचंदाचे सिडेर व्हिनेगर – चामखीळची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही कोरफडाचे जेल देखील लावू शकतात.

2) केळीची साल – केळी अनेक गुणांनी समृद्ध आहेत. त्याची सालेही फायदेशीर असतात. केळीची साल त्वचेसाठी चांगली असतात. केळीची साल चामखीळ पासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम औषध आहे. केळीची साल चामखीळ सुकवण्यास उपयुक्त आहेत. केळीची साल बाधित भागावर ठेवा आणि या जागेला कापडानं बांधा. हे नियमितपणे अवलंबल्यास काही दिवसांत चामखीळ कोरडी होऊन निखळून पडेल.

3) बेकिंग सोडा – चामखीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळावे आणि हे मिश्रण चामखीळवर लावून हलक्या हातांनी मालिश करा. एका तासानंतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. एक महिना नियमितपणे हा उपाय केल्यास फरक जाणवेल.

4) लसूण – लसणामध्ये अँटीफंगल आणि जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत, जो त्वचेवरचे चामखीळ काढण्यात मदत करतो. दोन लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखीळवर लावा. तासाभरानं तो भाग स्वच्छ पाण्यानं धुवा. आपण दिवसातून दोनदा हा उपाय करू शकता.

5) कांद्याचा रस – कांद्याच्या रसाने देखील चामखीळ काढता येते. एका कांद्याचा रस काढा. आता या रसाने चामखीळच्या जागी काही वेळ मालिश करा. महिनाभर दिवसातून एकदा या पद्धतीचं अनुसरण करा. चामखीळची समस्या काही दिवसातच दूर होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *