मित्रांनो आपल्या घरामध्ये जर जास्त सामान असेल तर आपण थोडे सामान हे बेड खाली ठेवून देतो कारण घरामध्ये पसारा होण्याची शक्यता नसते बेडमध्ये ठेवल्यानंतर ना ते कुणाला दिसत देखील नाही व त्याच्यामुळे जास्त जागा देखील जात नाही पण मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जर तुम्ही बेडमध्ये ठेवत असाल.
तर त्याचे दुष्परिणाम हे खूप होतात तर त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो तुम्हाला चांगली व शांत झोप लागण्यासाठी तुमचा पलंग हा स्वच्छ असल्यास खूप गरजेचा आहे म्हणजे जे तुम्ही तुमच्या बेडवर अंथरता ते एकदम स्वच्छ असले पाहिजे व जिथे झोपता ती जागा देखील स्वच्छ करायची आहे.
स्वच्छ असल्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. जर तुम्ही तुमच्या बेडच्या खाली काही गोष्टी ठेवल्यामुळे तुम्हाला रात्री वेळेवर झोप लागत नसेल चित्र विचित्र स्वप्ने पडत असतील किंवा अनेक तुम्हाला काही भास होत असतील त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चुकूनही बेड खाली ठेवायचे नाही वास्तुशास्त्रानुसार त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो व घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आले आहे की ज्या वस्तू तुम्ही बेडखाली ठेवता वस्तू ठेवताना तुम्ही अगोदर विचार करायचा आहे कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर व मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आणि त्यात सर्वात महत्त्वाची व पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार बेडखाली इलेक्ट्रॉनिक च्या वस्तू ठेवू नये. त्याच्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळेच मानसिक स्वास्थ देखील बिघडते.
त्याचबरोबर आपल्याला झोप न येण्याची समस्या देखील फार होते जर तुम्हाला झोप न येण्याच्या समस्या पासून त्रासलेल्या असाल तर तुम्ही तुमचा एक वेळा बेड उघडा व त्याच्यामध्ये कोणते कोणते सामान आहे ते बघा जरी इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्या वस्तू जर तुम्ही ठेवला असेल तर त्या तुम्हाला ताबडतोब तिथून काढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो देखील आपल्याला त्याच्या मधून काढायचा आहे.
इलेक्ट्रॉनिक च्या वस्तू म्हणजे ज्या वस्तू बंद आहेत त्या वस्तू आपण जर बेडमध्ये ठेवलेला असेल व आपल्याला कोणत्या गोष्टी लागत नसतील त्या देखील आपण ठेवल्या असतील तर त्या वस्तू तेथून आपल्याला काढायचे आहेत ज्या गोष्टींची आपल्याला आता तिथे गरज लागणार नाही. अशा वस्तू आपण तिथे बिनकामाच्या ठेवायच्या नाहीत.
ज्या वस्तू चालू असून देखील तुम्ही वापरत नसाल उदाहरणात म्हणजेच की डेविड प्लेयर तुम्ही वापरत नसाल तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बेड खाली ठेवायची नाही. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू हव्या असतील तर तुम्ही घरामध्ये दुसरा कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता.
एक दिवस तुम्ही हा सर्व बेडखांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा अनेक कोणत्याही प्रकारच्या वस्तू जर काढला तर तुम्हाला अत्यंत शांत व सुखाची झोप लागणार आहे.आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या बेडखाली आपण जुन्या कपड्यांचे गाठोड करून टाकलेलं असतो ते देखील आपल्याला तिथून काढायचा आहे.
प्रत्येकाच्या घरामध्ये हे आपण वापरत नसलेले कपडे बेडच्या खालीच आपण टाकतो. बेडच्या खाली कपड्यांची गाठोड असेल तर आपल्याला ते आत्ताच काढायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात व आपल्याला झोप सुद्धा लागत नाही ते काढल्यानंतर आपल्याला चांगली झोप लागते.
आपल्या घरामध्ये सुख शांती व समृद्धी येते व आपल्या घर हे सकारात्मक ऊर्जेने बनते. त्याचबरोबर गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू बेडखाली कोणतेही गंजलेले वस्तू ठेवायची नाही त्याच्यामधून तयार होणारी ऊर्जा घरामध्ये अत्यंत खराब वातावरण तयार करते त्याचबरोबर आर्थिक संकटे देखील घेऊन येते आणि त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या बेड खाली प्लास्टिकच्या वस्तू ठेवला असतील तर त्या देखील वास्तुदोष निर्माण करतात
बेडखाली झाडू ठेवणे देखील खूप अशुभ मानले जाते कारण याच्या मनावर आणि बुद्धीवर नकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील घरामध्ये निर्माण होतात त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या व्यक्ती आजारी पडायला देखील सुरुवात होते त्याच प्रकारे कोणत्याही प्रकारच्या धातूच्या वस्तू अथवा झोपले.
आपल्याला वेळच्या खाली ठेवायचे नाहीयेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देखील असली तरी देखील आपल्याला तिथे ठेवायची नाहीत किंवा आपल्याला न लागणाऱ्या बॅग्स असतील तरी देखील आपल्याला तिथून ते काढायचे आहेत.वास्तुशास्त्रावर जरी तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही साधा सोपा विचार करा
जर तुम्ही पलंगाखाली एवढा कचरा ठेवला आणि तुम्ही त्या पलंगावर झोपला त्या पलंगावर मग तुम्हाला झोप कशी लागेल आणि जर तुम्हाला झोप लागली तर ती शांत असणार नाही झोपेमध्ये तुम्हाला समाधान मिळणार नाही त्याचबरोबर जे तुमच्या पलंगाखाली जो कचरा आहे.
तो काढा व तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या व तुम्हाला जर शांत झोप पाहिजे असेल तर तुम्ही आजच तुमच्या पलंगाखाली ज्या वस्तू मी काढायला सांगितलेले आहेत त्या वस्तू काढल्याने तुम्हाला शांत व सुखाची झोप लागणार.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.