नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही वनस्पती असतेच असा एकही शेतकरी सापडणार नाही की, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सीताफळाचे झाड पाहायला मिळणार नाही. या दिवसांमध्ये सीताफळ भरपूर प्रमाणात येत आहेत. हे सीताफळ शरीरासाठी खूप अत्यंत लाभदायी ठरत. तसेच मित्रांनो हे सीताफळ खाल्यानंतर काही व्यक्तींना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.
यासोबतच हे सीताफळ कोणत्या व्यक्तीने खाऊ नये आणि सीताफळ खाल्यानंतर कोणते आजार कमी होतात यासाठी आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो सीताफळ खाण्यापूर्वी काही व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न असतात. सीताफळ खाल्ल्यावर खरंच सर्दी होते का? सीताफळ खाल्ल्यानंतर पाणी कधी प्यावे, सीताफळ नेमके कधी खावे असे असंख्य प्रश्न सीताफळ खाल्ल्याच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांची उकल आपण पुढे पाहणार आहोत.
मित्रांनो हे जे सीताफळ पाहता आहात आयुर्वेदानुसार हे सीताफळ शीतल, मधुर रसाचे पित्तशामक, कपकारक, तृषाशामक आहे. तसेच हृदय रक्तवर्धक, बलवर्धक आणि मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायक आहे. सीताफळ खाल्ल्यानंतर एक वेगळाच फिल मिळतो. यानंतर इन्स्टंट शरीराला एनर्जी येते.
कितीही विकनेसपणा असेल तर त्या वेळेस तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. परंतु हे सिताफळ सकाळी उठल्याबरोबर काही व्यक्ती खातात. काहीही न खाता सीताफळ खाल्ल्याच्या नंतर मित्रांनो त्या व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता असते. जास्त सकाळी उठल्याबरोबर सीताफळ खाल्याच्या नंतर काही व्यक्तींना चक्कर, मळमळ आल्यासारखे होते.
म्हणून सीताफळ खाण्याची योग्य वेळ दुपारी साधारणतः खावे. किंवा जेवण केल्यानंतर काही खाल्ल्यानंतरच सीताफळ खावे. सीताफळ खाताना प्रमाणातच खावे जास्त सीताफळ खाणं शरीरासाठी चांगलं नसत. यानंतर मित्रांनो सिताफळ खाल्ल्याच्या नंतर लहान मुलांना पाणी प्यायला लगेच लागतंच.
कारण सीताफळ खाल्यानंतर घशामध्ये थोडसं कोरडेपणा जाणवतो. लगेच त्यांना तहान लागल्यासारखे जाणवते आणि सीताफळ खाल्याच्या नंतर लगेच पाणी पिलं की, लगेच त्या व्यक्तीला सर्दी होण्याची शक्यता असते. म्हणून सीताफळ खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. पाणी प्यायचे झाले तर पंधरा ते वीस मिनिटानंतर काहीतरी पदार्थ खा त्यानंतर पाणी प्या.
बऱ्याच वेळेस या सीताफळवरती वातावरणाचा परिणाम होऊन अशा सीताफळावरती बुरशी आल्यासारखी होते. बऱ्याच व्यक्तींना याची माहिती नसल्या कारणामुळे त्या व्यक्ती सीताफळ आहे म्हणून हे सीताफळ खातात.
खाल्ल्यानंतर मित्रांनो हे सीताफळ खाताच त्या व्यक्तीला उलटी यासोबत मळमळ, डिसेंट्री लागण्याची शक्यता असते. म्हणून जर असं जर बुरशीजन्य सीताफळ कितीही मोठे, कितीही छान दिसत असेल त्यावरती जर बुरशी असेल तर अस सीताफळ खाणं एकदम टाळा.
हे सीताफळ दिसायला जेवढी आकर्षक आहे तेवढेच यामधील आ यु र्वे दि क गुणही अत्यंत लाभदायक ठरतात. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, लोह, थायमिन, व्हिटॅमिन C, त्यासोबतच व्हिटॅमिन B, B2, B6 भरपूर प्रमाणात असतात.
ज्याद्वारे ज्या व्यक्तींना यानेमिया आहे रक्ताची कमतरता आहे त्यांचं रक्त भरून येण्यासाठी सीताफळ अत्यंत लाभदायक ठरतं. हृदयासंबंधी जेवढ्याही तक्रारी असतील त्या तक्रारी कमी होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. या सोबतच ज्या व्यक्तींना हाय ब्लडप्रेशर आहे तो ब्लूडप्रेशर नियंत्रित येण्यासाठी सीताफळ अत्यंत लाभदायक ठरत.
डायबिटीस व्यक्तींनी थोडस प्रमाणात खाल्ले तर त्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर ठरते. त्यासोबतच मित्रानो ज्या व्यक्तींना सतत कमजोरी, थकवा, अशक्तपणा जाणवतो त्या व्यक्तीने तर हे सिताफळ खायलाच हवे. त्या व्यक्तींचे कमजोरी, अशक्तपणा थकवा अत्यंत लवकर कमी दिवसांमध्ये हे फळ खाल्याने फायदा होतो.
ज्यावेळेस तुम्ही हे सीताफळ खाणार त्याच वेळेस तुम्हाला लगेच इन्स्टंट एनर्जी देणारे हे फळ अत्यंत शरीरासाठी लाभदायक ठरत. तसेच ज्या व्यक्तींना पित्त आम्लपित्त वारंवार होतं त्या व्यक्तीने सीताफळ खाल्यानेही त्या व्यक्तीला अत्यंत फायदा होतो. यासोबत आपण जे सीताफळ खातो आणि सीताफळ खाल्ल्याच्यानंतर या बिया आपण टाकून देतो या बिया टाकून न देता घरात स्टोअर करून ठेवा. कारण याचा अत्यंत फायदा आपल्यासाठी होणार आहे.
ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये उवा लिखा पडलेले आहेत अशा व्यक्तींसाठी यासोबतच केस गळती ज्यांना होते, ज्या व्यक्तींच्या डोक्यावर टक्कल पडलेलं आहे त्यांच्यासाठी या सीताफळाच्या बिया अत्यंत वरदान सांगितलेल आहे. या सिताफळाच्या बियामध्ये ज्या बिया आपण काळे दिसतात त्या बिया फोडून आतील गर आहे तो जर शेळीच्या दुधामध्ये जर गोठून लावला ज्या ठिकाणी टक्कल पडलेला आहे त्या ठिकाणी लावा तिथे केस येण्यासाठी फायदा होतो.
या सोबतच ज्या व्यक्तींच्या डोक्यामध्ये लिखा आहे त्या वेळेस तुम्ही पाण्यामध्ये या बियामधील जो गर आहे तो गर आपल्याला काढून त्या पाण्यामध्ये वाटून घ्या. तो डोक्याला लावा पूर्ण मुळाशी लावल्यानंतर साधारणतः ही पेस्ट 1 तास ठेवा. एक तासानंतर केस धुऊन घ्या. परंतु हे करत असताना डोळ्याकडे याची पेस्ट किंवा याचे पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. डोळ्याला त्रास होण्याची शक्यता असते. असा हा उपाय केल्यानंतर तुमच्या या सर्व समस्या कमी होतील.
तसेच सीताफळ कोणत्या व्यक्तीने खाऊ नये. ज्या व्यक्तींना सर्दी, पडसे अतिप्रमाणात आहे, छातीमध्ये कप जमा झालेला आहे अशा व्यक्तींनी सीताफळ खाणे टाळा. कारण सीताफळ हे कपकारक, शीतल असल्याकारणांमुळे छातीतील कप आणि सर्दी वाढण्याची जास्त शक्यता असते. तसेच ज्यांना डायबिटीज जास्त प्रमाणात आहे त्यांनी सीताफळ खाणे टाळा कारण शुगर वाढू शकते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.