आठवड्यात प्रत्येक वारी कोणत्या देवाची कशी पूजा करावी?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आयुष्यामध्ये पैसा कोणाला नको असतो पैशासाठी आपण कोणते हि काम करू शकतो.आपण जर देवा देवतांना प्रसन्न केले तर त्याच्या आशीर्वादामुळे चांगली प्रगती होते. आपण अजून जास्त मेहनतीने पैसा कमवू लागतो.तर मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात देव हे असतातच. पण प्रत्येक देवाचे वार कोणते आहेत हे आपल्याला माहीत नसतात.

चला तर मित्रांनो मग आता आपण जाणून घेऊया की आठवड्यातील सात वार जे असतात ते प्रत्येक वाराचे कोणते कोणते देव आहेत व त्या दिवशी आपल्याला कोणते कार्य करायचे आहे. जेणेकरून त्याचा फायदा आपला धंद्यावर किंवा आपल्या करिअरवर होतो .

तर मित्रांनो सोमवार हा वार श्री भगवान शंकर यांचा आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण दुधाचा अभिषेक करू शकतो किंवा सोमवारी मंदिरामध्ये जाऊन बेल वाहू शकतो. सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा हिरवे वस्त्र जरी परिधान केले तरी चालेल. मंगळवार मंगळवार हा वार श्री हनुमान यांचा आहे. या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे.

जेणेकरून आपल्याला अनेक संकटापासून हनुमानजी दूर ठेवतील. पुढचा वार म्हणजे बुधवार श्री गणेश म्हणजेच आपले विघ्नहर्ता. आपले सर्वांचे लाडके बाप्पा यांचा हा वार आहे. बाप्पा आपल्या सर्वांचे लाडके असतात. कारण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे त्यांचे भक्त आहेत.

आपण कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये सापडलो असलो तरी आपल्याला त्याच्यातून बाप्पा बाहेर काढतात. बापांचे आवडते पदार्थ म्हणजे मोदक. त्यादिवशी आपण गणपतीला कुंकू अर्पण केल्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो असे म्हटले जाते.पुढचा वार म्हणजे गुरुवार. गुरुवार श्री विष्णू यांचा आहे.

आपले कोणतेही महत्त्वाचे काम किंवा आपले करिअर वरील आपल्याला कोणतेही विचार करायचे असतील किंवा आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचे असेल तर गुरुवार हा दिवस अतिउत्तम आहे. पुढचा वार म्हणजे शुक्रवार. शुक्रवार हा वार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवार हा वार धनांशी संबंधित मानला जातो.

शुक्रवारी आपल्याला कोणतीही कामे करायचे असेल तर आपण ते करू शकतो. आपल्याला त्या दिवशी पैसा प्राप्त होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो पुढचा वार म्हणजे शनिवार. शनिवार हा वार म्हणजे शनिदेवतेचा वार. जर शनिवारी काळी वांगी अर्पण केल्यास शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात व आपले वाईट प्रसंग टळून जातात.

सर्वांचा आवडता दिवस म्हणजे रविवार. रविवार हा दिवस सर्वांना फार आवडतो. कारण रविवारी शाळेला सुट्टी असते व वेगवेगळ्या कामांना सुद्धा सुट्टी असते. रविवार हा सूर्यदेवतेचा वार आहे. रविवार सगळ्यांचा फेवरेट असतो कारण रविवारी सगळे परिवार एकत्र असतात व एकत्र मज्जा मस्ती करायला मिळते. त्याच्यामुळे रविवार हा दिवस सगळ्यांचा फेवरेट असतो.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हीही आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या देवांची पूजा अगदी मनोभावे करायचे आहे. जेणेकरून देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली पूजा ते स्वीकारतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्यावर कायम ठेवतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *