असे केल्याने स्वामींचे साक्षात दर्शन होईल, अनुभव येईल, तुम्हाला जे हवे ते सर्व मिळेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे साक्षात दर्शन होण्यासाठी, स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि सर्व काही मिळण्यासाठी काय करावे लागते? तर मित्रांनो हे करा, ही गोष्टी करा, हे काम करा. स्वामींचे साक्षात दर्शन होईल. अनुभव येतील आणि सर्व काही मिळेल.

स्वामींची कृपा होईल, तुम्ही हे काम रोज करू शकता आणि खूप सोपे काम आहे मित्रांनो फक्त या गोष्टी करा. स्वामींचे साक्षात दर्शन होईल. आता तुम्हाला करायचे काय आहे?

मित्रांनो जी ही स्वामींची सेवा करत असाल ती तुम्हाला मनापासून करायची आहे. विश्वासाने करायचे आहे. असे नाही की कोणाचे तरी ऐकले आहे, कोणी तरी सांगितलं आहे स्वामींची सेवा करा सगळं काही अनुभव येतील.

तस नाही मित्रांनो मनातून जो आवाज येतो, मनापासून जे येत तेच आपण करायला पाहिजे. अस नाही की, अर्धा अर्धा एकेक तास बसून आपण सेवा करतोय, मंत्र जाप करतोय, फक्त 5 मिनिट बसा.

जे करता येईल ते करा किंवा काही जमत नसेल, काहीच येत नसेल, काहीच माहीत नसेल तर फक्त 5 मिनिट, 10 मिनिट स्वामींच्या मूर्तीसमोर स्वामींच्या फोटोसमोर किंवा देवघरासमोर बसा. फक्त बसून रहा.

आणि मनात कोणतीही गोष्ट ठेऊ नका, स्वार्थ ठेऊ नका फक्त देवघरासमोर बसून रहा. शरण जाऊन बसून रहा ते ही चालेल. फक्त जे करताय ते मनापासून करा किंवा भक्तीभावाने करा. पूर्ण विश्वासाने करा.

जर त्या गोष्टीमध्ये विश्वास नसेल किंवा मनापासून ती गोष्ट होत नसेल तर देवता पण, स्वामी पण प्रसन्न होत नाहीत. आणि आपली परीक्षा बघितली जाते. म्हणून मित्रांनो एक माळ करत आहात तर विश्वासाने करा.

एक माळ पण 101 माळी येवढी प्रभावी असते. जे तुम्ही एकवेळेस किंवा पाच मिनिट श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करत आहात आणि दुसरा जर एकेक तास जप करत आहे. पण एकेक तास जप करणाऱ्याला विश्वास नाही आहे.

किंवा तो मनोभावाने करत नाही आहे तर काही उपयोग नाही आहे. आणि 5 मिनींट जप करणारा मनोभावाने, निस्वार्थ मनाने आणि विश्वासाने जो जप करतो तर त्याला सगळं काही मिळेल. स्वामींचे साक्षात दर्शन होईल.

म्हणून मित्रांनो स्वामींचे साक्षात दर्शन व्हावे असे वाटत असेल, अनुभव हवे असतील आणि सगळं काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर ती मनापासून आणि विश्वासाने करा.

11 माळी, 51 माळी, 101 माळी नाही केल्या तरी चालतील. अर्ध्या तास, एक तास सेवा नाही केली तरी चालेल. 1 माळ करा 2 मिनिट, 5 मिनिट बसा पण अस बसा की, तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की, तुम्ही आज काय तर केलं आहे.

काही शुभ गोष्टी केल्या आहेत आणि तुम्हाला अस जाणवलं पाहिजे की, दैवीय शक्ती तुमच्या अवती भवती फिरती आहे. म्हणून मित्रांनो जे कराल ते मनापासून आणि विश्वासाने करा.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *