नमस्कार मित्रांनो,
मित्रानो नंदी आणि बैल हे वेगवेगळे असतात. बैल शेती कामासाठी वापरला जातो. त्याला नांगराला , औताला किंवा बैलगाडीला जुंपलं जात. बैलाच्या नाकामध्ये वेसण ओवली जाते. ज्याच्याकडून कष्ट करवून घेतले जातात त्याला बैल असे म्हणतात.
याउलट काही बैलांना महादेवांच्या नावाने सोडलं जात. त्यांच्या नाकामध्ये वेसण नसते. वेसणीला हिंदी मध्ये नकेल असत म्हणतात. वेसण बैलाच्या नाकात ओवतात. अशा प्रकारे जर वेसण नाकात ओवलेली असेल आणि महादेवांच्या नावाने एखाद्या बैलाला सोडलं असेल तर असा बैल नंदी म्हणवला जातो.
असा नंदी जर तुम्हाला कुठेही दिसला रस्त्याने चालताना किंवा अगदी कुठेही तर एक छोटासा उपाय तुम्ही अगदी आवर्जून करा. मूठभर हिरवे मूग आणि सफेद रंगाचं एखाद पुष्प ( फुल ) घ्यायचं आहे.
एक मूठ हिरवे मूग आणि एक सफेद रंगाचं फुल अर्थातच ते केतकीच नसावं कारण ते महादेवांना प्रिय नाही. केतकीच फुल महादेवांना अर्पण करत नाहीत. मूठभर मूग आणि सफेद पुष्प घेऊन आपण शिवालयात जायचं आहे. महादेवांच्या मंदिरात जायचंय.
शिवलिंगावरून ज्या ठिकाणी पाणी खाली पडत त्याठिकाणी हे हिरवे मूग आणि सफेद पुष्प आपण स्पर्श करायचं आहे आणि मंदिरात ज्या ठिकाणी नंदी देवांची स्थापना केलेली आहे त्या नंदी चरणी ते फुल अर्पण करायचं आहे.
आणि ते हिरवे मूग तुम्हाला जो नंदी दृष्टीस पडला होता त्या नंदीस खाऊ घालायचे आहेत. मित्रानो हा उपाय करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपली जी काही मनोकामना आहे ती या नंदीसमोर बोलून दाखवा.
अगदी घटस्फोटापर्यंत जरी परिस्थिती आली असली तरीही पती पत्नी पुन्हा एकत्र येतात. आपल्या वैवाहिक जीवनात कितीही मोठ्या समस्या असुद्या. पती पत्नी मध्ये सतत भांडणे होतात अगदी घटस्फोट होण्यापर्यंत परिस्थिती आलेली आहे.
तरीसुद्धा पती पत्नी एकत्र येतात. तुमचा पती किंवा तुम्ही पत्नी जर पर स्त्रीकडे किंवा पर पुरुषाकडे आकर्षित होत असेल , तुमचा संसार अगदी मोडकळीस आलेला आहे तरी सुद्धा तो पुन्हा जुळून येतो.
मित्रानो हा उपाय फक्त पती पत्नीस नव्हे तर आपल्या कुटुंबात जर एकोपा राहिलेला नसेल , कुटुंबातील लोक एकमेकांशी शत्रुत्व भावनेने वागत असतील तर कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी हा एक छोटासा उपाय आपण अवश्य करा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.