आपल्या घरातील देवघराची नजर काढावी.याने घरात लगेचच फरक जाणवेल. आपण माणसांची नजर काढतो, आपल्या घराची नजर काढतो, परंतु आपल्या घरातील जे मुख्य ठिकाण आहे ज्या ठिकाणावरून आपल्याला दैवीय शक्ती मिळते, नकारात्मकता जाते सकारात्मकता मिळते, जिथे आपण दररोज दिवा लावतो, अगरबत्ती लावतो. तसे तर तिथे नजर काढण्याची गरज नसते. देवघर म्हणजे जिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट मागण्याचा हक्क असतो.
तिथे प्रत्येक देवाची शक्ती असते. इथे नजर काढण्याची तर मुळीच गरज नाहीये. परंतु आपण आपल्या देवघराची नजर काढावी. कारण बऱ्याच वेळेला आपल्या चुका होतात, देवपूजा व्यवस्थित होत नाही, नियमांचे पालन होत नाही, मूर्ती आपण असंच देवघरात आणून ठेवून देतो त्याचे अभिषेक करत नाही, प्राणप्रतिष्ठा करत नाही.
तर अशा वेळेस देवघरात देवीय शक्तीच नसते व त्याच्या अवतीभवती नकारात्मकतेचा वाईट शक्तीचा वावर असतो. म्हणून आपण कोणत्याही एका दिवशी आपल्या घराची नजर तर काढावी. त्यासोबतच आपल्या देवघराची नजर देखील काढावी. कारण याने कोणतीही वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या घरात आपल्या देवघरात राहत नाही.
आता कोणता दिवस ठरवावा? तर तुम्ही शनिवारचा दिवस किंवा मंगळवारचा दिवस असा एक दिवस ठरवू शकता. त्या दिवशी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे. पूजेचा नारळ. तो नारळ सोलायचा नाही. जसा आणाल तसाच राहू द्यायचा. मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरात बसायचं आणि सात वेळा तो नारळ आरती ओवाळतो तसं उजव्या हातात घेऊन संपूर्ण देवघरावरून सात वेळा गोल फिरवायचा आहे.
सात वेळेस फिरवून झाल्यानंतर ते नारळ लगेचच पाण्यात प्रवाहित करायचं किंवा पाण्यात विसर्जन करायचं. आता तुम्ही म्हणाल की आमच्या कडे नदी नाही, तलाव नाही, समुद्र नाही तर आम्ही कोठे प्रवाहीत करु? तर घराच्या बाहेर एक बकेट ठेवा, एक टब ठेवा किंवा एका भांड्यात पाणी घ्या नारळ बुडेल एवढं त्याच्यात पाणी टाका.
नारळ सात वेळेस फिरवून झाल्यानंतर डायरेक्ट घराच्या बाहेर जा व नारळ त्या पाण्यात टाकून द्या. संपूर्ण दिवस त्या पाण्यातच नारळ राहू द्या. दुसऱ्या दिवशी पाणी बाहेर अंगणात टाकून द्या आणि नारळ कुठेतरी फेकून द्या. झाडाखाली टाकून द्या. अशा प्रकारे तुम्ही देवघराची नजर काढू शकता.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका