आपलीच माणसे वाईट वागतात तेव्हा काय करावे?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर अत्यंत विश्वास ठेवलेला असतो व त्या व्यक्तीने जर आपला विश्वासघात केला तेव्हा आपल्याला जवळच्या काही गोष्टी त्यांना आपण आपली माणूस सांगत असतो व त्याचं ती व्यक्ती परत आपलेच गोष्ट जर दुसऱ्याला सांगत असल्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो.

विश्वास ठेवून समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील सर्व भावना व्यक्त करत असतो. पण समोरची व्यक्ती आपल्याशी कसं वागते हे आपल्याला माहित नसते. म्हणूनच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील सांगताना विचार करून सांगायची अशी स्थिती आता झाली आहे. तर मित्रांनो जवळची व्यक्ती वाईट वाटते तेव्हा नेमकं काय करावं चला तर आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो खुद्द धनुर्धर अर्जुनालाही रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला होता वैर करायचं पण कुणाशी आपल्याच भावंडांची गुरुजनांची मग यांना इतके दिवस आपण आपले मानत होतो ते का अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हटलं अर्जुना हे जग असंच आहे.

तू ज्यांना आपलं मानतोस ते जर तुला आपलं मानत असते तर हातात तलवार गदा आणि धनुष्य घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते.तू त्यांच्याबद्दल मोह शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्मरक्षणार्थ युद्ध कर अर्जुनाच्या सोबत तर स्वतः भगवंत होते.

पण आपलं काय आपली समजूत काढायला देव किती वेळा येणार रोजच्या जगण्यात आपली ही अवस्था अर्जुनासारखीच होते. अशावेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला तोच सल्ला आपल्याला लागू होतो माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवरायला पहीजे

प्रख्यात लेखक व पु काळे यांचे वपुंची माणसं हे पुस्तक वाचताना लक्षात येतं आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठी नाही. आपल्या त्याच्या भावनात्मक पात्राच्या तोंडी आधुनिक भाषेत जगण्याचं मर्म सांगितलं आहे.आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठी नाही.

आपल्या दुसऱ्याकडूनच अपेक्षा असतात असं नाही आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत. आपण फक्त दुसऱ्याकडूनच काही ना अपेक्षा ठेवत असतो व त्या जर अपेक्षा समोरच्या व्यक्तीने भंग केली.आपल्याला त्याचा अधिकच त्रास होतो. आपण फक्त दुसऱ्यावर अवलंबून राहिलो.

तर फक्त आपल्याकडे जळणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही हा जन्म परत भेटीसाठी आहे तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुमचे जे कोणी साथीदार असेल ते तुम्हाला अर्ध्या मध्ये सोडून गेले त्यांची साथ तुम्हाला काही वर्षांसाठी किंवा काही दिवसांसाठी असली तरी तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतला. याचा अर्थ कोणत्यातरी जन्माची परतफेड झाली तो विषय संपला.

याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. घरामध्ये मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत ही सुद्धा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.परतफेडीचा हिशोब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही.

तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलं असा प्रश्न विचारायचा नाही कोणतीही व्यक्ती असो की तुमच्याशी विचित्रवाणी वागते तुमचा अपमान करते.तुमच्याकडे दुर्लक्ष करते तुमच्या उपकाराचं कुणाला विस्मरण झालं तर एकेक विषय पूर्ण झालं असं आजपासून स्वतःला सांगायला लागा बँकेतली शिल्लक संपली की पासबुक अकाउंट क्लोज असा शिक्का मारतात.

त्याचप्रमाणे आपले किती विषय संपले याचा विचार करा आणि पासबुकच जाळून टाका. परत भेटीचा एकही क्षण टाळू नका प्रारंभी तुम्हाला जड जाईल पण आपलं मन जेवढ बलदंड असतं तेवढेच लवचिकही असतं.मित्रांनो जे आपण दुसऱ्या सोबत वागणार आहे ते आपल्या सोबत देखील घडू शकते याच्यामुळे आपण कोणत्याही व कुणाच्याही कोणत्याही गोष्टीसाठी कधीही फायदा घ्यायचा नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *