अमावस्येला करा ‘या’ गोष्टी मिळेल पुण्य!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रुढीपरंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेले आहेत आणि या परंपरांचे अनेक जण पालन देखील करीत असतात. कारण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. परंतु आपल्यापैकी बरेच जण याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष देखील करीत असतात.

परंतु मित्रांनो यामुळे आपल्या जीवनात बऱ्याचशा अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला देखील खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे.म्हणजेच पौर्णिमा अमावस्या यांना विशेष स्थान प्राप्त झालेले आहे. तर 19 मे 2023 रोजी वैशाख अमावस्या आहे आणि वैशाख अमावस्येनंतर ज्येष्ठ महिना सुरू होतो.

तर आपल्या धर्मामध्ये अमावस्येला नेमक्या आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी सांगितले गेलेले आहे. म्हणजेच आपण जर या गोष्टींचे पालन केले तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

तर मित्रांनो अमावस्येला नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षांमध्ये भगवान विष्णू, ब्रम्हा आणि महेश यांचा वास असतो आणि तुम्ही अमावस्या तिथीच्या दिवशी जर वटवृक्षाची विधीवतपणे पूजा केली तर तुमच्या ज्या काही नोकरी व्यवसायातील अडचणी असतील त्या सर्व दूर होतील आणि तुमची नक्कीच प्रगती होईल.

जर तुम्ही ज्येष्ठ अमावस्येला पहाटे लवकर उठून पवित्र नदीत स्नान करून तीळ, दूध आणि तिळापासून बनवलेली कोणतीही जर मिठाई गरीब आणि गरजूंना जर दान केली तर तुमच्या सर्व पापांचा नाश होतो आणि सुख उपभोगायला मिळते. त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्ही ज्येष्ठ अमावसेला पिंपळाच्या झाडाच्या मुळास कच्चे दूध, काळे तीळ, गंगाजल, साखर, फुले, तांदूळ आणि पाणी अर्पण करायचे आहे.

आणि नंतर’ओम पितृभ्यै नमः’ या मंत्राचा जप करावा, अशी श्रद्धा आहे. असे केल्याने प्रत्येक कार्य सफल होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला सर्व क्षेत्रांत यशही मिळते.तसेच आपल्या घरातील विवाहित महिलांसाठी अमावस्या खूपच महत्त्वाची असते. म्हणजेच हे जर व्रत तुम्ही केला तर यामुळे अनेक लाभ आपल्याला मिळत असतात.

यावेळी जेष्ठ अमावस्येला अनेक दुर्मिळ योग घडत आहेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही पूजा आणि स्नानाव्यतिरिक्त काही उपाय जर केले तर व्रत करणाऱ्याला अनेक पटींनी अधिकाधिक लाभ मिळत राहतात.तर मित्रांनो तुम्ही देखील येणाऱ्या १९ मे च्या अमावस्येला वरील गोष्टी नक्की कराव्यात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच नांदेल आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि तुमची प्रगती होत राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *