अक्षय तृतीयेपासून या 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस…

राशिभविष्य अध्यात्मिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया यंदा 22 एप्रिल आली आहे आणि या अक्षय तृतीयेपासून पाच राशींना अनेक स्तरांवर लाभ होणारे आहेत. तर कोणत्या आहेत त्या 5 राशी आणि नक्की कशा प्रकारचा त्यांना लाभ होणार आहे? कशा प्रकारे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे? त्यांच्या कौटुंबिक पातळीवर काय बदल होणार आहेत? चला जाणून घेऊया..

नवग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह सध्याच्या घडीला मेष राशीमध्ये विराजमान असून आणि मेष राशीत अर्थात अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी हा बुध ग्रह वक्री होणार आहेत आणि बुद्धाच्या वक्री स्थितीचा 5 राशींना फायदा होणारे 5 राशीच्या व्यक्ती मालामाल होणार आहेत.

1. मेष राशी: मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणं अनुकूल ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. करिअरच्या उत्तम संधी चालून येतील. नोकरदारांना सुद्धा चांगले प्रोत्साहन मिळू शकते. व्यवसायातही त्यांची प्रगती प्रगती झालेली दिसून येईल.नोकरीत नवीन संधी मिळाल्याने पैशाची चांगली बचत होईल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळाल्याने पगारात अचानक लक्षणीय वाढ दिसून येते. कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप असतील, हे मात्र मान्य करावे. लागेल त्या समजुतदारपणाने पूर्ण करू शकले हे ही तितकच खरं. मात्र या सगळ्यात जोडीदाराशी भांडण होऊ शकतात त्यामुळे थोडं सांभाळून.

2. मिथुन रास: मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा हा काळ अत्यंत लाभदायक आहे. अक्षय तृतीयेपासून प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. अक्षय तृतीयापासून त्यांना नवीन संधी सुद्धा मिळतील. कठोर परिश्रमाच्या जोरावर ते यश मिळू शकते. कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांची संबंध पूर्वीपेक्षा सुद्धा सुधारतील. व्यापाऱ्यांना व्यवहारांमध्ये लाभ व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकते. आर्थिक दृष्ट्याही अनुकूल काळ ठरू शकेल. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकाल आणि म्हणूनच नवीन घर किंवा कार घेणे सुद्धा तुम्हाला त्यामुळे शक्य होईल.

3. सिंह राशी : अक्षय तृतीयेपासून लाभ होणारी तिसरी रास म्हणजे सिंह राशी होय. सिंह राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. हव ते काम करायला त्यांना मिळेल. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास मजबूत होईल. करिअरमध्ये प्रत्येक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. जे अनेक दिवसांपासून परदेशात जाण्याचा प्रयत्न करत होते त्या आता त्यामध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. प्रत्येक कामात एकंदरीतच तुम्हाला उत्साह वाटेल. शक्य असल्यास बुधवारी दुर्गा सप्तशतीचा पठन करावं.

4. कुंभ राशी: कुंभ राशीच्या व्यक्तींना अक्षय तृतीयापासून सोन्याचा दिवस येणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्या करिअरमध्ये त्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास खूप वाढणार आहे. त्यांची प्रगती पाहून त्यांचा बॉस सुद्धा त्यांचं कौतुक करेल. करिअरच्या नवीन संधी त्यांना मिळू शकतात. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात भरघोस नफा दिसून येईल. वडिलोपार्जित मालमत्तेत तून सुद्धा तुम्हाला लाभ होणार आहे. थोडक्यात काय तर कुटुंबामध्ये समृद्धी येणार आहे.

5. मीन राशी: अक्षय तृतीय लाभ होणारी पुढील राशी म्हणजे मीन रास होय. मीन राशीच्या व्यक्तींना सध्या साडेसाती चालू आहे, पण हा काळ त्यांच्यासाठी यशस्वी ठरू शकेल. करिअरमध्ये विशेष यश मिळू शकेल. सकारात्मक वातावरण निर्माण होईल. प्रमोशनची शक्यता निर्माण होत आहे. नोकरीसाठी नवीन ऑफर येतील. कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहिल्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल. वेळेत बचत वाढू शकेल. व्यवसायात परदेशी स्रोतांकडून नफा मिळू शकेल. कुटुंबात चांगला वेळ जाईल. मुलां सोबत फिरायला जाण्याचा प्लान तुम्ही बनवू शकता. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *