अक्षय तृतीयेला करा हे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय!

अध्यात्मिक माहिती

आपल्या सर्वांना वाटत असते की आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न व्हावे व आपल्याला कोणत्याही गोष्टींमध्ये कमी पडायला नको. म्हणजेच की आपल्याला जे काही पाहिजे आहे ते आपल्याला सर्व भेटले पाहिजे. अशी आपली अपेक्षा असते.तर मित्रांनो अक्षय तृतीया ही खूप महत्त्वाची असते. व खूप शुभ देखील असते.साडेतीनशे मुहूर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो.

अक्षय याचा अर्थ असा आहे की कधीही न संपणारा. अक्षय तृतीयाला काही लोक सोने खरेदी करत असतात. किंवा कोणी नवीन व्यवसाय चालू करत असतात. म्हणजेच की अक्षय तृतीया हा दिवस पूर्ण शुभ दिवस मानला जातो.आपल्याला कोणते महत्त्वाचे जरी काम करायचे असले तरी आपण अक्षय तृतीयेपासून सुरुवात करावी.

म्हणजेच की आपल्याला कोणत्या नुकसानास भाग पाडणार नाही. आपल्याला ज्या काही वस्तू हव्या आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत. आपल्याला कोणत्याच गोष्टीची कधीही कमी पडणार नाही.आणि आपण कोणताही धंदा जर चालू केला तर त्याच्यातून फक्त आपल्याला यश मिळणार आहे.

आपल्याला जर सोने खरेदी करायचं होत नसेल तर मित्रांनो या अक्षय तृतीयाला मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे.जो तुम्ही केल्यास तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होणार आहे.तर मित्रांनो तो कोणता उपाय आहे चला तर आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो कवड्या प्रत्येकांना माहीत असतात ते समुद्रामध्ये आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात.किंवा ते माता लक्ष्मीला खूप आवडतात. त्याच्यामुळे आपण या अक्षय तृतीयेला कवड्यांचा उपाय करणार आहोत. तर कसा उपाय करायचा आहे. ते मी आता तुम्हाला सांगणार आहे.

पुरातनकाळापासूनच कवडी ही लक्ष्मी दायक मानली गेली आहे. फकत आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानल जा. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे वापर केला जातो.या प्रकारे तुम्ही अक्षतृतीयेच्या दिवशी पूजा केल्यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचा आहे.

त्याच्यामध्ये अकरा कवड्या ठेवायच्या आहेत. व त्याची पूजा करून तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचे आहे.तुमच्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहे.असे केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात येते.त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आर्थिक समस्या हळूहळू दूर होऊ लागतात.

त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्त यासारखी स्तोत्र म्हटला तर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला परिणामहोतो. तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येईल महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असेल तर ते अकरा वेळा म्हणा.आणि श्री सूक्त म्हणणार असाल तर ते सोळा वेळा म्हणा अक्षय तृतीयेच्या दिवशी याप्रमाणे फक्त किंवा महालक्ष्मी अष्टक म्हटला तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्की येईल.

कवड्यांचा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कोणतीच गोष्टीची कमी भासू देणार नाही. व तुम्हाला जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा मिळणार आहे. तर मित्रांनो मी जो वरती तुम्हाला कवड्यांचा उपाय सांगितलेला आहे. तो तुम्ही नक्की जरूर करून पहा याचा तुम्हालाच लाभ होणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *