जाणून घ्या, अधिक महिन्यात तांबूल दानाचे महत्व…

अध्यात्मिक माहिती

पद्मपुराणात पुरुषोत्तम मास, माल मास किंवा अधिक मास याचं महत्त्वाचं वर्णन आले आहे. त्यात अधिक मासात करायची व्रते, दान विधी किंवा फलश्रुती याचे महत्व सांगितले जाते. अधिक मासात उपवासाचे विशेष महत्व आहे, यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि पुत्रयोगाचा लाभ होतो असे म्हणतात. मात्र अधिकच्या या महिन्यात महिला तांबूल दान का करतात? त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात..

दुष्काळात तेरावा महिना अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित म्हण आहे. मराठी महिन्यात दर 3 वर्षांनी हा तेरावा महिना येत असतो. या महिन्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मालमास याबरोबरच धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. मराठी महिन्यामध्ये तिथीला अधिक महत्त्व असते.

बऱ्याचदा एकाच दिवशी 2 तिथी येतात, त्यामुळे तिथी ही कमी कमी होत जातात याची भरपाई करण्यासाठी या महिन्याची योजना केले असं सांगण्यात येतं. अधिक महिन्यात दीपदान, गंगास्थान, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, धार्मिक विधी केले जातात. याचबरोबर अधिक महिन्यात महिला तांबूल दान सुद्धा करतात.

अधिक महिना भर तांबूल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. शिवाय तांबूल दान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो, असे म्हणतात, म्हणूनच तांबूल दानात सामान्यता पाने, सुपारी, कात आणि चुना तसेच कित्ता यांचे दान करतात. यालाच तांबूल दान असेही म्हणतात.

तसेच या वस्तू रंगीबिरंगी कापडाने झाकून पत्नी ब्राम्हणाला दान करते. तर काहीजण दान करण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सोन, चांदी तांब किंवा पितळ दान करतात. असं म्हणतात की, पान-सुपारी किंवा पानांचा पुढचा भाग त्याची देठ, चुना आणि काथ वगैरे रात्री खाल्ल्यानं पाप लागतं आणि मनुष्याला दारिद्र्य भोगावे लागतात.

हे पाप आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी तांबूल दान करावं असं सांगितलं जातात. म्हणूनच अधिक महिन्यात महिला तांबूल दान करतात. हे दान मात्र ब्राम्हणांना द्यावे लागते. हे दान देताना या स्त्रिया म्हणतात, ब्राह्मण श्रेष्ठ मी तुला सर्व स्वाहा तांबूल देते, मला पापमुक्त कर..

तसेच शास्त्रानुसार या उपायने पापांतून मुक्ती मिळते असे म्हणतात. याबरोबरच अधिक महिनाभर तांबूल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते, असंही म्हटलं जातं. शिवाय अधिकच या महिन्यात महिनाभर अखंड दीप लावल्यास देवी लक्ष्मीची आशीर्वादही प्राप्त होतात

आणि त्याच्या महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगा स्नान केल्याने सुद्धा सर्व पापातून मुक्ती मिळते, असे म्हटल्या जातात. याबरोबरच अधिक मासात केलेल्या पूजनाचे किंवा तीर्थयात्रेचा अनेक पटींनी आपल्याला प्राप्त होतं, तर असं सुद्धा सांगण्यात येते.
तर तुम्हीसुद्धा अधिक मासात त्याच्या महिन्यात तांबूल दान करता का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *