आरतीचं ताट ओवाळताना अनेकजण करतात या चुका; पूजा-विधीचं मिळत नाही इच्छित फळ

अध्यात्मिक

मित्रांनो,प्रत्येक घरामध्ये देवघर हे असते. देवघरांमध्ये मित्रांनो अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मुर्त्या असतात. प्रत्येक जण देवी देवतांची अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा देखील करीत असतात. देवी देवतांच्या पूजेला खूप असे महत्त्व दिले गेलेले आहे आणि या पूजेमध्ये आरतीचे खूपच महत्त्व आहे. कारण कोणताही धार्मिक विधी किंवा कोणतीही पूजा ही आरती शिवाय अपूर्ण मानली गेलेली आहे.

त्यामुळे मित्रांनो आपल्या दररोजच्या पूजेमध्ये आरतीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. मग ते मंदिरात असो किंवा आपल्या घरात असो. आरती केल्यावरच जे काही आपण पूजा करतो किंवा व्रत करतो याचे आपणाला शुभ फळ प्राप्त होते.

हिंदू पुराणांमध्ये आरती करण्याची योग्य पद्धत आणि नियम सांगितले गेलेले आहेत. तर मित्रांनो आपण आरती करताना आरतीचे ताट जेव्हा ओवाळतो त्यावेळेस बरेच जण अशा काही चुका करत असतात त्याचे मग अशुभ फळ आपणाला मिळत असते. तर मित्रांनो आरतीचे ताट ओवाळताना नेमके कोणत्या चुका आपण करू नये याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हिंदू धर्मग्रंथांमध्ये आरतीचे ताट किती वेळा ओवाळायचे याविषयी माहिती सांगितली गेलेली आहे. तर मित्रांनो शास्त्रानुसार आरती चार वेळा देवाच्या चरणी,
दोन वेळा नाभीकडे, एकदा चेहऱ्याकडे आणि सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत करावी. तर मित्रांनो अशा प्रकारे 14 वेळा आरती ओवाळावी असे शास्त्रात सांगितले आहे.

तसेच आपण जे आरतीचे ताट वापरतो ते ताट तुम्ही जमिनीवर कधीही ठेवायचे नाही. कारण त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. आरती करण्यापूर्वी आणि आरती केल्यानंतर आरतीचा दिवा ताटात किंवा उंच ठिकाणी ठेवावा. दिवा लावल्यानंतर आणि पेटवण्यापूर्वी हात स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही पूजेच्या पाठात देवी देवतांची आरती केल्यानंतरच पाण्याने आचमन आपण जरूर करायचे आहे. यासाठी आरतीचे ताट किंवा दिवा खाली ठेवून फुलांमधून थोडे पाणी घेऊन किंवा एखाद्या पूजेच्या चमच्याने दिव्याभोवती दोनदा फिरवा आणि ते पाणी ताटात सोडा. यानंतर आपल्या चुकीबद्दल देवांची क्षमा मागून कुटुंबातील सदस्यांना आरती द्यायची आहे.

मित्रांनो आपण जर तुपाच्या दिव्याने आरती केली तर आपणाला स्वर्गलोकांमध्ये स्थान मिळते. असे भगवान विष्णूंनी शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. तसेच कापूर लावून आरती करणाऱ्याला अनंतात प्रवेश मिळतो आणि जो व्यक्ती पूजेमध्ये केलेल्या आरतीचे दर्शन करतो त्याला परमपदाची प्राप्ती होते

स्कंद पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीला मंत्र माहीत नसेल, पूजेची संपूर्ण पद्धत माहीत नसेल, परंतु भगवंताच्या उपासनेत भक्तिभावाने सहभागी झाला असेल तर त्याची पूजा भगवंत स्वीकारत असतात.

तर मित्रांनो तुम्ही देखील पूजेमध्ये किंवा ज्या वेळेस तुम्ही व्रत, उपवास करता त्यावेळेस तुम्ही आरती करत असाल तर या गोष्टींकडे तुम्ही अवश्य लक्ष देणे गरजेचे आहे आणि आरतीचे ताट ओवाळताना ही काळजी घ्यायची आहे. जेणेकरून आपल्या जीवनात मग कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *